8.5 लाख रुपयांची झाली फसवणूक
वसमत तालुक्यातील गिरगाव येथील हे तीन शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांची जवळपास साडेआठ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिंचोली येथील एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मारुती नैताम नावाच्या व्यक्तीने गिरगाव येथील शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर देण्याचे आमिष दिले होते. आपल्या कंपनीमार्फत विदर्भात भंडारा जिल्ह्यात देखील अनेक शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर दिल्याचे त्याने सांगितले. या शेतकऱ्यांनी भंडारा जिल्ह्यात शहानिशा करून प्रत्येकी चार चार लाख रुपये आरटीजीएस केले. परंतु त्यानंतर मारुती नैताम याने ट्रॅक्टर दिलेच नाही त्यानंतर त्याचा संपर्कही बंद झाला. आता या मारोती नैतामने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांची सबसिडीवर ट्रॅक्टर देतो म्हणून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान भंडारा पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. हा प्रकार आता गिरगावातील या शेतकऱ्यांना माहित झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार कुरुंदा पोलीस ठाण्यात दिली आहे.
advertisement
आणखी शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याची माहिती
सामाजिक कार्यकर्ते रवी नादरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ट्रॅक्टरच्या अमिषाला बळी पडलेले हे तीन शेतकरी जरी पुढे आले असले तरी अजून देखील शेतकरी फसले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.