छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील पाल गावात रवि राजपूत यांना दुग्ध व्यवसायात अपयश आल्यानंतर खचले नाही, तर त्यांनी शेळीपालनाचा पर्याय निवडला. राजपूत गेल्या 15 वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. सुरुवातीला स्थानिक जातीच्या शेळ्यांपासून सुरुवात करून, अनुभवाच्या जोरावर त्यांनी व्यवसायात सुधारणा केली.
advertisement
सध्या त्यांच्याकडे लहान-मोठ्या अशा 20 आफ्रिकन बोअर शेळ्या आहेत. आफ्रिकन बोअर शेळ्या त्यांच्या जलद वाढीसाठी आणि चांगल्या मांसासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे शेळीपालनाला फायदा होतो. शेळीपालनातून ते वर्षाला 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
शेळीपालन करताना काही वेळा अनेक व्हायरल इन्फेक्शन येतात आणि आजार, त्यावेळी जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यात त्यांना प्रतिबंधक म्हणून लसीकरण करणे, जंतनाशक देणे, वेळेवर त्यांचे चारा-पाणी करणे अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. तसेच, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मोफत करतो आणि आमच्या संपर्कात येऊन जवळपास 10 हजार शेतकऱ्यांनी शेळीपालन सुरू केले, असे देखील राजपूत यांनी सांगितले आहे.