वाशिममध्ये पिवळ्या सोयाबीनच्या दराने गाठला उच्चांक, गुरुवारचे बाजारभाव काय?

Last Updated:

Soyabean Bajar Bhav Today : राज्यातील सोयाबीन बाजारपेठेत गुरुवारी मोठे चढ-उतार पाहायला मिळाले.

Soyabean Market
Soyabean Market
मुंबई : राज्यातील सोयाबीन बाजारपेठेत गुरुवारी मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. नाफेड खरेदीची अपेक्षा, खुले बाजारातील व्यापाराचा वेग, स्थानिक मागणी आणि आवक यात झालेल्या बदलांमुळे विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 3,000 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान राहिले. राज्यातील काही ठिकाणी दरात तेजी दिसून आली. तर काही बाजारांमध्ये घसरण नोंदली गेली.
advertisement
आजचे बाजारभाव काय?
10 व 11 डिसेंबरच्या आवक आणि दरातील अंदाज पाहता मराठवाडा व विदर्भातील बहुतेक बाजारपेठांमध्ये दरात 4,200 ते 4,500 रुपयांचा स्थिर कल असून, काही ठिकाणी सर्वोच्च भाव 5,400 ते 5,800 रुपयांपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे.
वाशिममध्ये सर्वाधिक बाजारभाव
advertisement
सर्वात जास्त दर वाशीम या बाजार समितीत नोंदवला गेला. येथे पिवळ्या सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 5,800 रुपयांच्या वर पोहोचला असून सरासरी दर 5,500 रुपये राहिला. जालना बाजार समितीतही दरवाढीचा कल कायम असून येथे कमाल दर 5,400 रुपये नोंदवला गेला.
advertisement
त्याउलट काही भागांत दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. कोरेगाव येथे सोयाबीनचा दर 5,328 रुपये कायम होता; पण पाचोरा, दर्यापूर, आर्वी, वरुड, मलकापूरसह अनेक ठिकाणी किमान दर 3,000 ते 3,500 रुपयांच्या खाली घसरला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून आले.
advertisement
लातूर बाजार समितीत 14,504 क्विंटलची मोठी आवक झाली. येथे कमाल दर 4,525 असून सरासरी दर 4,400 रुपये नोंदवला गेला. अमरावती, नागपूर, हिंगोली, चंद्रपूर आणि माजलगाव या भागांतही आवक मोठ्या प्रमाणात असून, दर 4,000 ते 4,300 रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे. नांदेड बाजारात 725 क्विंटल आवक झाली आणि येथे दर 3,875 ते 4,400 रुपये नोंदवला गेला.
advertisement
विदर्भातील सिंदी, आर्णी, उमरखेड, घाटंजी या बाजारांतही दर चांगल्या पातळीवर राहिले. सिंदी येथे कमाल दर 4,565 रुपये, तर आर्णी येथे 4,600 रुपये नोंदवले गेले. बुलढाणा, चिखली, वणी तसेच बाभुळगाव या बाजारांतही दरात मध्यम तेजी दिसून आली.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात भाव काय?
उत्तर महाराष्ट्रातील येवला, लासलगाव, निफाड, पिंपळगाव(ब) येथे दर 4,300 ते 4,500 रुपयांच्या आसपास राहिले. पिंपळगाव(ब)-पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनचा सर्वाधिक दर 4,611 रुपये नोंदवला गेला. बारामतीमालेगाव (वाशिम) भागातही 4,400 ते 4,435 सरासरी दर कायम राहिला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
वाशिममध्ये पिवळ्या सोयाबीनच्या दराने गाठला उच्चांक, गुरुवारचे बाजारभाव काय?
Next Article
advertisement
Goa Night Club Fire: गोवा नाइट क्लब आग प्रकरण: थायलंडमध्ये लपलेल्या लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या? वाचा Inside Story
गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?
  • गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

  • गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

  • गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

View All
advertisement