आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1558 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 603 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3400 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 112 क्विंटल आल्यास 5600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Agriculture News : ऑनलाइन शेतमाल विक्री करताय? प्रॉफिट कसा होईल? Video
advertisement
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1262 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1130 क्विंटल द्राक्षास 120 ते 400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 970 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
डाळिंब दराची लाली वाढली
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1939 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 895 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल गणेश डाळिंबास 12500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





