Success Story : एकदा लागवड अन् वर्षानुवर्षे उत्पादन, मराठवाड्यातील शेतकऱ्याने केली पानाची शेती, 3 लाख निव्वळ नफा
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हे गाव पानमळ्याची शेती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील बारी समाज मुख्यत्वे हे काम करतो.
जालना : प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी पान खाल्ले जाते. पानाला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्व आहे. शुभविवाह असो की शुभकार्ये पान लागतेच लागते. परंतु, या पानाची शेती कशी होते हे तुम्हाला माहीत आहे का? याचीच शेती जालन्यातील प्रयोगशील शेतकरी मंगेश बेराड यांनी केली आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
कशी करावी शेती?
जालना जिल्ह्यातील भारज हे गाव पानमळ्याची शेती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील बारी समाज मुख्यत्वे हे काम करतो. परंपरेने बारी समाज पानमळ्याची शेती करत आला आहे. पावसाळ्यात साधारणपणे जून महिन्यात पानाची लागवड केली जाते. तत्पूर्वी शेवगी किंवा शेवगा लावला जातो. या मळ्यात सावली गरजेची असते तसेच वेलीला आधार देण्यासाठी या झाडांचा वापर केला जातो.
advertisement
यानंतर या शेतीसाठी शेणखताचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच पानवेलींना बांधण्यासाठी कुशल मजुराची देखील आवश्यकता असते, असं पानमळा शेतकरी मंगेश बेराड यांनी सांगितलं.
खर्च वजा जाता 3 लाख रुपये नफा
एकदा लागवड केली की वर्षानुवर्षे पानाचे उत्पादन घेता येते. परंतु, पानमळ्याच्या शेतीला विमा संरक्षण नाही. यामुळे आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई मिळत नाही. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना इत्यादी ठिकाणी पानांची विक्री होते. अर्धा एकरात 5 लाख रुपये होतात. खर्च वजा जाता 3 लाख रुपये नफा राहतो, असं मंगेश बेराड यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 4:36 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : एकदा लागवड अन् वर्षानुवर्षे उत्पादन, मराठवाड्यातील शेतकऱ्याने केली पानाची शेती, 3 लाख निव्वळ नफा







