भारतातील अशी गावं जिथे खेळली जात नाही होळी, एक तर असं जिथे 200 वर्षांपासून होळी खेळणं बॅन!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांची उधळण आणि आनंदाचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळते. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आपल्याच देशात अशी काही गावे आणि ठिकाणे आहेत जिथे गेल्या अनेक वर्षांपासून होळी खेळली जात नाही.
advertisement
advertisement
दुसेरपूर, हरियाणा: कॅथल जिल्ह्यातील या गावात गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ होळी खेळली जात नाही. एका साधूने होळीच्या दिवशीच अग्नी समाधी घेतली होती. मरण्यापूर्वी त्यांनी शाप दिला होता की, जोपर्यंत गावात होळीच्या दिवशी बछडा किंवा मुलगा जन्माला येत नाही, तोपर्यंत होळी साजरी करू नये. ही अट अद्याप पूर्ण झाली नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
advertisement
advertisement
रामसन गाव, गुजरात: बनासकांठा जिल्ह्यातील या गावात गेल्या 200 वर्षांपासून होळी साजरी केली जात नाही. असे म्हटले जाते की, 200 वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी या संपूर्ण गावाला आग लागली होती आणि मोठी हानी झाली होती. एका संताने गावाला शाप दिला होता की, इथे जो कोणी होळी साजरी करेल, त्याचे नुकसान होईल. तेव्हापासून येथे होळीचा अग्नी प्रज्वलित केला जात नाही.
advertisement
दुर्गापूर, झारखंड: बोकारो जिल्ह्यातील या गावात होळी खेळणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे मानले जाते. शंभर वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी येथील राजाचा मृत्यू झाला होता. मरताना राजाने होळी साजरी न करण्याची आज्ञा दिली होती. जर कोणी येथे रंग खेळले, तर गावात महामारी किंवा नैसर्गिक आपत्ती येते, अशी भीती आजही लोकांमध्ये आहे.
advertisement
तामिळनाडू: उत्तर भारतात जशी होळी साजरी होते, तशी दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी होत नाही. येथे होळीला 'कामान पंडिगाई' म्हणून ओळखले जाते. काही ठिकाणी या दिवशी विरहाचे गाणे गायले जाते, कारण याच दिवशी कामदेवाचे दहन झाले होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रंगांची उधळण टाळली जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









