खरा मान्सून 14 जूननंतर
हवामान तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अनुभवास येणारा पाऊस आणि वारे खऱ्या मान्सूनचा भाग नाहीत.14 जूननंतरच खरा आणि स्थिर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल. त्यामुळे तत्पूर्वी पेरणी केल्यास बियाण्यांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे ढगाळ हवामान
सध्या मराठवाड्यात जोरदार वाऱ्यांसह आकाशात ढग कायम आहेत. परंतु हे बदल ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे निर्माण होत असून. याचा खऱ्या मान्सूनशी थेट संबंध नाही. हे वारे आणि ढग मान्सूनसाठी आवश्यक असलेल्या वातावरणात अडथळा निर्माण करतात, अशी माहिती डॉ. औंधकर यांनी दिली.
advertisement
पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस किती?
कृषी तज्ज्ञांच्या मते, पेरणी करण्यासाठी किमान 100 ते 150 मिमी पावसाची नोंद आवश्यक आहे. त्यानंतर 5 ते 6 दिवस हलक्या सरी झाल्यासच जमिनीत पुरेसा ओलावा तयार होतो. यापूर्वी पेरणी केल्यास बियाण्यांचे अंकुरण अपयशी ठरू शकते आणि नुकसान संभवते.
लागवडीचा योग्य कालावधी कोणता?
खरीप हंगामासाठी लागवडीसाठी 15 जून ते 30 जून हा कालावधी अत्यंत उपयुक्त मानला जातो. शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अपडेट्स आणि कृषी विभागाच्या सूचनांनुसारच शेतीसंबंधी निर्णय घ्यावेत, असा सल्ला डॉ. डाखोरे यांनी दिला आहे.
मान्सून यंदा सरासरीपेक्षा थोडा कमी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडासा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रत्येक टप्प्यावर योग्य माहितीच्या आधारे करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी घाई करू नये
मराठवाड्यात खरा मान्सून 9 ते 18 जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या झालेला पाऊस मान्सूनपूर्व असला तरी काहींनी चुकीने त्यालाच खरी सुरुवात मानली. खरीप लागवडीसाठी योग्य वेळ 15 जूननंतरच असणार आहे. योग्य प्रमाणात (75 ते 100 मिमी) पाऊस झाल्यानंतर व पुढील काही दिवस हलका पाऊस अपेक्षित असल्याशिवाय पेरणी करणे टाळावे.
