TRENDING:

शहरात नोकरी करताय पण गावाकडे शेती आहे, अशा व्यक्तींनी शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा?

Last Updated:

Farmer Certificate : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कृषी क्षेत्राशी जोडलेले अनेक योजनेचे लाभ, अनुदाने आणि शासकीय सवलती मिळवण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कृषी क्षेत्राशी जोडलेले अनेक योजनेचे लाभ,अनुदानं आणि शासकीय सवलती मिळवण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असतो. अनेक शेतकऱ्यांना हा दाखला कसा मिळवायचा आणि पात्रता काय? याबाबत अजूनही स्पष्ट माहिती नसते. त्यामुळे अनेक लाभ मिळूनही अर्जाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. म्हणूनच शेतकरी दाखल्यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेऊ..
Agriculture News
Agriculture News
advertisement

शेतकरी असल्याचा दाखला म्हणजे काय?

एखादी व्यक्ती प्रत्यक्षरित्या शेती करत आहे किंवा तिच्या नावावर शेतीची जमीन आहे याचा अधिकृत सरकारी पुरावा म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला. हा दाखला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतो आणि अनेक सरकारी योजनांमध्ये तो आवश्यक दस्तऐवज म्हणून वापरला जातो.

शेतकरी दाखला मिळवण्यासाठीची पात्रता काय?

शेतकरी दाखला मिळवण्यासाठी खालील अटी लागू होतात जसे की, अर्जदाराच्या नावावर 7/12 उतारा, 8-अ उतारा किंवा जमीन नोंदणी दस्तऐवज असणे.शेती वारसाहक्काने मिळाल्यास वंशावळीचा पुरावे. प्रत्यक्ष पिक घेत असल्याचे पुरावे (गरजेनुसार) तसेच जमीन भाडेपट्ट्यावर घेतली असल्यास अधिकृत करारनामा आवश्यक असतो. शेतकरी हा पुरुष किंवा महिला कोणताही असू शकतो. दीड ते दोन गुंठेही जमीन असेल तरी पात्रता लागू होते. संयुक्त मालकी असेल तरी दाखला मिळू शकतो.

advertisement

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड

7/12 व 8-अ उतारा

जमीन खरेदी कागदपत्रे

रेशन कार्ड

रहिवासी दाखला

अर्जाची तपासणी झाल्यानंतर शेतकरी दाखला तयार करून तहसीलदारांच्या सहीने दिला जातो. नागरिकांना अधिक सुविधा म्हणून हा दाखला महासेवामार्गे ऑनलाइनही मिळू शकतो.अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकरी दाखला थेट डाउनलोड करून वापरता येतो.

शेतकरी दाखल्यामुळे मिळणारे फायदे

advertisement

शेतकरी दाखल्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजना व अनुदानांचा लाभ मिळू शकतो. त्यापैकी काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजना

खत, बियाणे व सिंचन साधनांवरील अनुदान

ट्रॅक्टर, शेतीची साधने व ड्रिप इरिगेशनवरील सबसिडी

कर्जमाफी / कृषी कर्ज / शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदराचे कर्ज

पिक विमा योजना

शेतीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम व शासकीय अनुदाने

advertisement

शेतीसाठी वीज दरात सवलत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्हाला माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक; समजून घ्या!
सर्व पहा

शेती विकास प्रकल्प, तलाव खोदकाम व जलसंधारण योजनांचा लाभ

मराठी बातम्या/कृषी/
शहरात नोकरी करताय पण गावाकडे शेती आहे, अशा व्यक्तींनी शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल