पीकस्पर्धा योजना राबविण्याचा उद्देश असा की, प्रत्येक तालुका व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी पुढे यावेत आणि त्यांच्या पद्धतींचे मार्गदर्शन आसपासच्या शेतकऱ्यांना मिळावे. त्यामुळे केवळ उत्पादनवाढ होत नाही, तर तंत्रज्ञानाचा प्रसारही वेगाने होतो. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होते आणि शेतीविषयक नवकल्पनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळते.
रब्बी हंगाम २०२४ साठीही मागील वर्षाप्रमाणेच तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीकस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस. असे यावर्षी स्पर्धेत एकूण पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
advertisement
पात्रता निकष
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. जसे की,
१) शेतकऱ्याच्या नावे जमीन असणे आणि त्याच जमिनीची तो स्वतः शेती करीत असणे आवश्यक.
२) शेतकरी इच्छेनुसार एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
३) संबंधित पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड केलेली असावी.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
७/१२ आणि ८-अ उतारा
जातीचा दाखला (आदिवासी शेतकऱ्यांसाठी आवश्यक)
७/१२ उताऱ्यातील घोषित क्षेत्राचा नकाशा
बँक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
प्रवेश शुल्क किती?
सर्वसाधारण गट : रु. ३००/-
आदिवासी गट : रु. १५०/-
