शेतकऱ्यांनी बियाणांची निवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार, हवामान आणि मागील वर्षातील पिकांचे अनुभव लक्षात घ्यावेत. बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत आणि पक्के बिल घ्यावे. त्यावर विक्रेत्याची आणि आपली स्वाक्षरी असावी. यामुळे पुढच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. शेतकऱ्यांनी आपल्याला आवश्यक असणारेच बियाणे खरेदी करावेत. कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना कृषी अधिकारी मेघशाम गुळवे यांनी लोकल 18 सोबत बोलताना केले आहे.
advertisement
कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या मान्यताप्राप्त वाणांची निवड करावी. बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे आणि त्यांच्याकडून पक्की पावती घेण्याचा आग्रह धरावा. त्या पावतीत बियाणाचे नाव, वाणाचे नाव, बॅच नंबर, लॉट नंबर, या सर्व बाबींचा समावेश असावा. बियाणे घेतल्यानंतर त्याचा काही नमुना बियाणे शिल्लक ठेवावे.
भविष्यात यासंबंधी काही तक्रार असेल तर शेतकऱ्यांना सोपे पडते. त्यामुळे पुरावा म्हणून हा घटक आपल्याकडे उपस्थित राहतो. बियाणांच्या पाकीटवर एमआरपी दिलेली असते, ती किंमत तपासून घ्यावी. त्या बियाणांची उत्पादन तारीख कधीची आहे, एक्सपायरी डेट कधी आहे या सर्व बाबी तपासून घेतल्या तर भविष्यात होणारा त्रास आपण टाळू शकतो, असे देखील गुळवे यांनी सांगितले आहे.





