हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी?
रविंद्र मेटकर हे एक पोल्ट्री व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी स्वतःच अनेक प्रयोग करून शेती आणि व्यवसाय विकसित केला आहे. हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबत त्यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली आहे.
ते सांगतात की, हिवाळ्यात कोंबड्यांचे शेड उबदार राहील याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोंबड्यांच्या शेडमध्ये थंडी आत येणार नाही यासाठी भिंतींना पोते, प्लास्टिक शीट किंवा पडदे लावण्यात यावे. दरवाजे-खिडक्या बंद ठेवा पण आत हवा खेळती राहील याची खात्री करून घ्या. रात्रीच्या वेळी तापमान खूप खाली गेल्यास लाल बल्ब किंवा आणखी काही सोईस्कर उपाय करणे गरजेचे आहे. कोंबड्यांना उबदार, पोषक आहार खायला देणे देखील महत्त्वाचे आहे. कणीस, बाजरी, तांदळाचे तुकडे, तेलबिया, सोयाबीन याचा समावेश आहारात करू शकता.
advertisement
Skin Care Tips: थंडीत त्वचा पडली कोरडी? हे घरगुती उपाय 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय करावं?
पाण्यातून सुद्धा व्हिटॅमिन, मिनरल देऊ शकता. कोंबड्यांना पाणी देताना थोडं कोमट असावं याची खात्री करून घ्या. व्हिटॅमिन A, D आणि E यासाठी वॅक्सिन किंवा इतर काही पूरक सप्लिमेंट देऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. थंडीच्या काळात ओलावा वाढतो, त्यामुळे शेड कोरडी ठेवणे अत्यावश्यक आहे. कोंबड्यांची विष्ठा दररोज काढून टाका. लसीकरण वेळेवर करून घ्या. थंडीमुळे कोंबड्यांचे पिसे गळणे किंवा अंडी देणे कमी होऊ शकते त्यासाठी आहारात प्रथिनांचा समावेश वाढवा. हिवाळ्यात योग्य तापमान, स्वच्छता आणि आहार यांची काळजी घेतल्यास कोंबड्या निरोगी राहतात आणि अंडी उत्पादनात घट होत नाही, असं त्यांनी सांगितले.





