TRENDING:

Turmeric Crop: तणामुळे हळद उत्पादनाला मोठा फटका, कसं कराल नियंत्रण?, Video

Last Updated:

कोणत्याही पिक उत्पादनात मशागतीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक ठरतो. तणामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होताना दिसते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: कोणत्याही पिक उत्पादनात मशागतीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक ठरतो.
advertisement

तणामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होताना दिसते. हळद पिकामध्ये शेणखताच्या वापराने शेतामध्ये तण जास्त प्रमाणात उगवते. याचा हळद उत्पादनाला फटका बसतो. हळद पिकात तण नियंत्रणासाठी यांत्रिकी, जैविक पद्धतीसह तणनाशकांचा प्रभावी वापर कसा करावा? याविषयी हळद संशोधक डॉ. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना माहिती दिली.

डॉ.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या हळद संशोधनातील प्रयोगानुसार तणनाशकांच्या प्रभावी वापराने हळद पिकामध्ये तणनियंत्रण करतात येते. तण नियंत्रणासाठी योग्य तणनाशकासह फवारणीचे प्रमाण, वेळ आणि पद्धती वापरणे अत्यंत आवश्यक ठरते.

advertisement

Farmer Success Story: नोकरी सोडली, फक्त 20 गुंठ्यांमध्ये सुरू केला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा

तण नियंत्रण

हळद लागवडीनंतर जमीन ओलसर असताना 24 तासांच्या आत ऑॅट्राझीन (50 डब्ल्यूपी) या तणनाशकाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ॲट्रॉसिंग फवारणी योग्य प्रमाणात आणि वेळेत केली तर एक महिना हळद पिकामध्ये कोणत्याही प्रकारचे तण उगवत नाही. महत्वाचे म्हणजे तणनाशकाची फवारणी पाठीमागे चालत करावी.

advertisement

तणनाशक फवारणी करण्यापूर्वी हळद बियाणे म्हणजेच हळदिचे गड्डे उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तणनाशक फवारणीनंतर 20 ते 25 दिवस आंतरपिकांची लागवड करू नये.

पहिल्या 24 तासांमध्ये फवारणी करणे शक्य झाले नाही तर; आठ ते दहा दिवसांमध्ये ग्रामोक्झोन किंवा ग्लायफोसेट तणनाशक 1 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम प्रमाणे तणनाशकाची फवारणी करावी. यामुळे शेतामध्ये उठलेले बारीक बारीक तण जळून जाते.

advertisement

तणनाशक फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हळदीची उगवण साधारण 15 दिवसांनी सुरू होते. त्यानंतर कोणतेही तणनाशक बिलकुल वापरू नये.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी

प्रत्येक वेळी पंप स्वच्छ धुणे आवश्यक ठरेल.

निवडक तणनाशकांचा वापर करताना मात्रा आणि वेळ महत्त्वाची.

वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन फवारणी करणे आवश्यक.

advertisement

पंपाची कार्यक्षमता तपासून तणनाशकांची मात्रा ठरवणे आवश्यक.

तणनाशकांच्या फवारणीसाठी डब्ल्यू एफ एन नोझलचा वापर करावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, आज आहे 45 कॅफेचा मालक
सर्व पहा

वरील सर्व बाबींचा विचार करून तणनाशकांचा वापर केल्यास तणांवर नियंत्रण आणू शकतो. शक्यतो तणनाशक जेवढी मात्रा दिली आहे तेवढीच वापरावी. एकच तणनाशक पुन्हा पुन्हा एकाच पिकात वापरले तर त्या तणनाशकाने तण नियंत्रण काही प्रमाणात कमी होताना दिसते. यात आपण तणनाशकांची फेरपालट केली तर तण नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.

मराठी बातम्या/कृषी/
Turmeric Crop: तणामुळे हळद उत्पादनाला मोठा फटका, कसं कराल नियंत्रण?, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल