मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी भारतामध्ये सर्वात प्रथम तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आढळून आलेली आहे. तर 2018 मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी या ठिकाणी या किडीची नोंद झाली. ही अमेरिकन लष्करी अळी मका पिकावर जास्त नुकसानकारक आहे. या किडीच्या मादीची प्रजनन क्षमता खूप जास्त असते. एक मादी पतंग एका वेळेस सरासरी 1600 ते 2000 हजार अंडी देऊ शकते.
advertisement
मक्याचे पान पूर्णपणे खाऊन टाकते, पानाचा हिरवा पापुद्रा खाणे, पानांना पांढरे चट्टे पडणे. अंतराने ही अळी कणसाच्या बाजूने आवरणाला छिद्र करून आतील दाणे देखील खाते. या अळीचे व्यवस्थापन करायचे असेल तर पाच टक्के निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम मेटारायझियम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी.
जर मका पिकावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत. तसेच आपल्या शेतात पक्षी थांबे लावणे, कामगंध सापळे लावणे. जर या कीटकाचे प्रमाण दहा टक्के पेक्षा जास्त दिसून आले तर स्पिनिटोरम, 11.7% एस. सी प्रति दहा लिटर पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. शेतकऱ्यांनी चारा पीक म्हणून मक्याची लागवड केलेली असेल तर त्यांनी रासायनिक खताचा वापर करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञ डॉक्टर पंकज मडावी यांनी दिला आहे. अशाप्रकारे मका पिकाची काळजी घेतली तर नक्कीच अधिकाधिक उत्पन्न मिळेल.





