युरियापेक्षा सर्वाधिक प्रभावी सेंद्रिय पर्याय
रब्बी पिकांसाठी जीवामृत हे सर्वात प्रभावी आणि मातीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत मानले जाते.हे पूर्णपणे नैसर्गिक असून मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. पिकांची वाढ, रोपांची फुलधारणा आणि उत्पादनक्षमता वाढवण्यात जीवामृताचे मोठे योगदान असते.
जीवामृताचा वापर केल्यानंतर मातीची सुपीकता वाढते.पिकांची वाढ वेगाने होते. पिकाची मुळं अधिक मजबूत होतात पाण्याचा बचत होते. तसेच खतांचा खर्च 50% ने कमी होतो
advertisement
रबी पिकांसाठी इतर उत्तम सेंद्रिय पर्याय
शेणखत (गोमूत्र + शेणखत मिश्रण) - हे सर्वात नैसर्गिक आणि मातीसाठी उत्तम खत आहे. रबी पिकांना आवश्यक असणारे नत्र,सेंद्रिय कार्बन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात पुरवले जाते.
कंपोस्ट - घरातील कचरा, पालेभाज्यांची अवशेषे आणि शेण वापरून तयार केलेले कंपोस्ट मातीची संरचना सुधारते.
वर्मी-कंपोस्ट - किड्यांच्या मदतीने तयार होणारे हे खत मातीतील सूक्ष्मजीव वाढवते आणि पिकांना वेगाने काम देणारा नैसर्गिक पोषक स्रोत मानला जातो.
घरच्या घरी जीवामृत कसे तयार करावे?
जीवामृत तयार करणे अतिशय सोपे आहे आणि यासाठी लागणारा खर्चही कमी आहे.
त्यासाठी साहित्य पुढील प्रमाणे आहे. जसे की, 10 किलो ताजे गोमूत्र, 10 किलो शेण
2 किलो बेसन किंवा पीठ, 1 किलो गूळ, 20 लिटर पाणी, मूठभर माती (शेतातील किंवा झाडाखालील)
प्रक्रिया काय?
मोठ्या ड्रम किंवा प्लास्टिकच्या भांड्यात पाणी टाका. त्यात शेण आणि गोमूत्र चांगले मिसळा. आता गूळ आणि बेसन भांड्यात चांगले ढवळून घाला. यात मूठभर नैसर्गिक माती मिसळा. हे मिश्रण रोज दोन वेळा काठीने ढवळा. मिश्रण 5 ते 7 दिवस आंबवल्यानंतर जीवामृत तयार होते.
रब्बी पिकांना होणारे फायदे कोणते?
गव्हाचे कणस आकार मोठे होतात. हरभर्याची फुलधारणा वाढते. ज्वारी व तीळ पिके अधिक तंदुरुस्त राहतात. मातीतील नत्र नैसर्गिकरित्या सक्रिय होते. तसेच उत्पादनात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होते.
