सोलिस S40 शटल XL – 40 HP एक शक्तिशाली ट्रॅक्टर
हे ट्रॅक्टर शेती आणि बागायती कामांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामध्ये 3-सिलेंडर इंजिन, मजबुत ट्रान्समिशन, 1000 किलोपर्यंत वजन उचलण्याची क्षमता, चालवायला सोपे आणि इंधनाची बचत करणारे हे मॉडेल आहे. शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर दैनंदिन कामात जास्त उपयोगी असून, आराम आणि टिकाव या दोन्ही बाबतीत उत्तम आहे.
advertisement
सोलिस EXTRA सिरीजचा अर्थ काय?
या सिरीजमध्ये Solis 26 HST आणि Solis 26 (9+9) हे प्रकार आहेत.
EXTRA या नावातील प्रत्येक अक्षराचा अर्थ आहे.
E – वाढीव हायड्रॉलिक क्षमता 775 किलो लिफ्ट, 640 किलो लोडर
X – वाढीव कार्यक्षमता शक्तिशाली पंप आणि जलद काम करणारी उपकरणे
T – मजबूत एक्सल सर्व भूप्रदेशावर चालण्याची क्षमता
R – विश्वसनीय कामगिरी 5 वर्षांची वॉरंटी
A – प्रगत तंत्रज्ञान आणि आराम सोपी नियंत्रणे,सपाट प्लॅटफॉर्म, आरामदायी सीट, ब्लूटूथ आणि USB सुविधा.
ही सिरीज कमी खर्चात जास्त काम करणारी म्हणून ओळखली जात आहे.
एकूण 7 मॉडेल
ITL ने स्टेज-V उत्सर्जन तंत्रज्ञान असलेली ट्रॅक्टर्सही दाखवली. हे ट्रॅक्टर्स प्रदूषण कमी करतात तसेच चालवताना अधिक आराम देतात. यामध्ये पुढील मॉडेल्सचा समावेश आहे. Solis S26+, Solis 26 HST – ब्लॅक एडिशन, Solis C48, Solis 90 NT, Solis S90 शटल XL, इलेक्ट्रिक राइड-ऑन आणि ZTR मॉवर, Solis S1 30E आणि S1 42E हे मॉडेल्स आहेत.
देरम्यान, हे सर्व मॉडेल्स भविष्यातील पर्यावरणपूरक शेतीसाठी तयार करण्यात आली आहेत. तसेच हे सर्व ट्रॅक्टर्स पंजाबमधील होशियारपूर येथील जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर प्लांटमध्ये तयार होतात. येथे दर दोन मिनिटांनी एक नवीन ट्रॅक्टर तयार करण्याची क्षमता आहे.
