मक्याची आवक नाही: कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, 21 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची आवक झालेली नाही.
कांद्याची आवक किती झाली?: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची आवक 51 हजार 469 क्विंटल इतकी झाल्याची नोंद आहे. त्यातील 21 हजार 970 क्विंटल लोकल कांद्याची सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. पुणे बाजारात कांद्याला 700 ते 2100 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. तसेच कांद्याला 2500 रुपये इतका सर्वाधिक बाजार भाव आज सातारा मार्केटमध्ये मिळाला. शनिवारी मिळालेल्या कांद्याच्या सर्वाधिक दरात आज पुन्हा घट झाली.
advertisement
सोयाबीनच्या सर्वाधिक दरात पुन्हा घट: राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 82 क्विंटल इतकी झाली. आज सोयाबीनची आवक फक्त लातूर बाजारात झाली. लातूर मार्केटमधील सोयाबीनला 4300ते 4695 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. शनिवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात पुन्हा घट झालेली दिसून येत आहे.