पंढरपूर तालुक्यातील अनवली गावात राहणारे शेतकरी अनंत मिटकरी यांनी अर्ध्या एकरामध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबाची लागवड करत असताना त्यामध्ये आंतरपीक म्हणून बिजली फुलाची लागवड केली आहे. डाळिंबावर फवारणी घेत असताना बिजली फुलांच्या रोपांवर कोणताही परिणाम होत नाही. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असल्याने बिजली फुलांना मागणी आहे. त्यामुळे अर्ध्या एकरामध्ये बिजली फुलांच्या 5 हजार रोपांची लागवड मिटकरी यांनी केली.
advertisement
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोकं, केली चेकनेट बोरांची शेती, 7 लाखांचा मिळाला नफा
डाळिंबाच्या बागेत बिजली फुलाच्या लागवडीसाठी शेतकरी अनंत मिटकरी यांना जवळपास दहा ते बारा हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. पंढरपुरात बिजली फुलांची 200 ते 300 रुपये किलो प्रमाणे विक्री होते. डाळिंबाच्या बागेत जवळपास दोन ते तीन महिने फुलांचे आंतरपीक घेता येते. या फुलांच्या विक्रीतून तीन महिन्यात मिटकरी यांनी डाळिंबाच्या रोपांचा व बिजली फुलाच्या लागवडीचा खर्च वजा करून दोन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी डाळिंबाच्याच बागेमध्ये शेवंती आणि झेंडू फुलाचे आंतरपीक मिटकरी यांनी घेतले होते. शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेत आंतरपीक म्हणून फुलांची लागवड केल्यास अधिक नफा मिळेल व डाळिंब लागवडीचा खर्चही निघेल, असा सल्ला प्रयोगशील शेतकरी अनंत मिटकरी देतात.





