गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 1810 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 737 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच जालना, सोलापूर, पुणे मार्केटमध्ये गुळाचा दर साधारणपणे तीन हजार ते चार हजार शंभर रुपये दरम्यान राहिला.
आले दरात चढ-उतार: राज्याच्या मार्केटमध्ये 2897 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1110 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3800 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 966 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4343 ते 6677 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
तीळाची उच्चांकी आवक: आज राज्याच्या मार्केटमध्ये 674 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 664 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.