कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने सोडत प्रक्रिया पार पडली. या सोडतीत ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर आदी विविध कृषी उपकरणांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
कागदपत्रांची यादी आणि पुढील प्रक्रिया
सोडत यादीत ज्यांचे नाव आले आहे, त्यांनी पुढील कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. जसे की,
advertisement
सात-बारा उतारा
जमीन होल्डिंगचा दाखला
निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन व टेस्ट रिपोर्ट
ट्रॅक्टर चलित उपकरणे असतील, तर संबंधित शेतकऱ्याचे आरसी बुक
हे कागदपत्र सादर झाल्यानंतर पूर्वसंमती घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर अनुदानाची रक्कम मंजूर होऊन वितरण करण्यात येईल.
जिल्हानिहाय यादी कशी पाहाल?
सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जा:
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FundDisbursedReport या पेजवर निधी वितरित लाभार्थी यादी हा पर्याय निवडा. त्यानंतर आपला जिल्हा,तालुका आणि गाव निवडा. यानंतर आपल्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये आपले नाव शोधून खात्री करता येईल. शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.