Soyabean Rate : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?

Last Updated:

मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
News18

News18

मुंबई: मंगळवार, दिनांक 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांचे कृषी मार्केट जाणून घेऊ. यामध्ये कांदा, मका आणि सोयाबीनची आवक आणि भाव पाहू.
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 2 लाख 35 हजार 723 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. आज नाशिक मार्केटमध्ये 1 लाख 50 हजार 796 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास कांद्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 390 ते जास्तीत जास्त 1 हजार 392 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 440 क्विंटल कांद्यास 2 हजार रुपये सर्वसाधारण भाव मिळाला.
advertisement
अशी राहिली मक्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये मक्याची एकूण 15 हजार 588 क्विंटल आवक राहिली. आज जळगाव मार्केटमध्ये 3500 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक होऊन त्यास 15 हजार रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 603 क्विंटल मक्यास सर्वाधिक 3200 रुपये बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीनचे दर दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची 41 हजार 268 क्विंटल आवक झाली. जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 17 हजार 612 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 3313 ते 4125 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तर नांदेड मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल कांद्यास 4000 ते 4500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
शेतकऱ्यांची अडचण, भावात तोटा
केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 5 हजार 338 रुपयांचा हमीभाव घोषित केला असला तरी बाजारात भाव सातत्याने दबावात आहेत. यामुळे प्रतिक्विंटल 1000 ते 1500 रुपये तोटा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement