33000 छायाचित्रकार, हिवरे बाजारमधील फोटो ठरला भारी, बैजू पाटील यांना जगप्रसिद्ध वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर येथील बैजू पाटील यांनी भारतीय वन्यजीव छायाचित्रणाचा अभिमान वाटेल असे ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील बैजू पाटील यांनी भारतीय वन्यजीव छायाचित्रणाचा अभिमान वाटेल असे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. जगप्रसिद्ध वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर - 2025 या स्पर्धेत बैजू पाटील यांनी दुसरे स्थान पटकावत भारतासाठी रौप्यपदक जिंकले. हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच रौप्यपदक मिळाले आहे.
वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांपैकी एक आहे, जी विशेषतः पक्षी छायाचित्रणासाठी समर्पित आहे. यावर्षी या स्पर्धेत जगभरातील 33,000 पेक्षा अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा युनायटेड किंगडममध्ये आयोजित केली जाते आणि जागतिक पातळीवर पक्षी छायाचित्रणाचा सर्वोत्तम मानक मानली जाते. या स्पर्धेतील छायाचित्र महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात टिपले आहे. छायाचित्रात एक पक्षी उडतानाचा क्षण विलक्षण कोनातून टिपला आहे. बैजू पाटील यांनी जमिनीवर उलटे झोपून, झेंडूच्या फुलांच्या शेतातून हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे.
advertisement
अतिशय अवघड अशी स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये मला रौप्यपदक भेटलेले आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण की संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचे नाव झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत होतो आणि या वर्षी मला याकरता पुरस्कार भेटला आहे. खूप छान वाटत आहे, असे फोटोग्राफर बैजू पाटील म्हणाले आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Oct 07, 2025 8:59 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
33000 छायाचित्रकार, हिवरे बाजारमधील फोटो ठरला भारी, बैजू पाटील यांना जगप्रसिद्ध वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड, Video







