TRENDING:

कापूस आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा, कांदा आणि तुरीला काय मिळाला आज भाव? Video

Last Updated:

9 जानेवारी शुक्रवार रोजी राज्यातील कृषीमार्केटमध्ये प्रमुख पिकांच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कपाशी, कांदा आणि सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा नोंदवली गेली असताना, तुरीच्या दरात मात्र पुन्हा घट झाल्याचे चित्र आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 9 जानेवारी, शुक्रवार रोजी राज्यातील कृषीमार्केटमध्ये प्रमुख पिकांच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कपाशी, कांदा आणि सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा नोंदवली गेली असताना, तुरीच्या दरात मात्र पुन्हा घट झाल्याचे चित्र आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
advertisement

कपाशीच्या दरात किंचित वाढ

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 15 हजार 313 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 4 हजार क्विंटल कपाशीची आवक नोंदवण्यात आली. नागपूर बाजारात कपाशीला 7700 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, वर्धा मार्केटमध्ये कपाशीला आज सर्वाधिक 8200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

advertisement

उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत करताय रासायनिक खतांचा वापर, वेळीच व्हा सावध, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम

कांद्याचेही दर सुधारले

आज राज्यातील कृषी बाजारात कांद्याची एकूण आवक 2 लाख 24 हजार 922 क्विंटल इतकी झाली. यामध्ये नाशिक मार्केटमध्ये लाल कांद्याची 77 हजार 431 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. नाशिक बाजारात कांद्याला किमान 519 रुपये तर कमाल 1708 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आलेल्या कांद्याला आज सर्वाधिक 2800 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.

advertisement

सोयाबीनच्या दरात सुधारणा

आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये एकूण 52 हजार 696 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये लातूर मार्केटमध्ये 12 हजार 533 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. लातूर बाजारात सोयाबीनला किमान 4033 रुपये तर कमाल 5104 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तर वाशिम मार्केटमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 6200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाल्याची नोंद आहे. गुरुवारी मिळालेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

तुरीच्या दरात पुन्हा घट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

आज राज्यातील कृषी बाजारात तुरीची एकूण 20 हजार 592 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जालना मार्केटमध्ये पांढऱ्या तुरीची 4 हजार 559 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. जालना बाजारात तुरीला 5100 ते 7426 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तसेच बीड आणि जालना मार्केटमध्ये आलेल्या काळ्या तुरीला आज सर्वाधिक 8000 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मात्र, गुरुवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात पुन्हा घट झाल्याचे चित्र आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
कापूस आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा, कांदा आणि तुरीला काय मिळाला आज भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल