महेशला सुरुवातीपासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. त्याने युट्यूब आणि सोशल मीडियावरील व्हिडिओजच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेतली. अनेक पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर शेवटी त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. योग्य माहिती, नियोजन आणि सातत्य यामुळे त्याने हा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला.
Food Business : नोकरीपेक्षा बिझनेस चांगला, तरुणाने सुरू केला व्यवसाय, आता कमतोय दुप्पट पैसे!
advertisement
आज महेश मागील दोन वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत असून त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये सुमारे 5000 पक्षी आहेत. या व्यवसायातून त्याला वर्षाला साधारण 6 ते 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. प्रारंभी काही अडचणी आल्या असल्या तरी महेश याने चिकाटी आणि आत्मविश्वासाने सर्व संकटांचा सामना केला. त्याच्या मेहनतीमुळे आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे.
महेश फक्त पोल्ट्री व्यवसाय करत नाहीत तर त्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या खताचा उपयोग शेतीसाठीही करतो. सेंद्रिय खताचा वापर करून त्याने उत्पादनात चांगली वाढ केली असून, शेतीचा खर्चही कमी झाला आहे. यामुळे त्याला दुहेरी फायदा मिळत आहे.
विशेष म्हणजे महेश याने केवळ स्वतःपुरताच हा फायदा मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही योग्य दरात खत पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा व्यवसाय समाजाभिमुख ठरतो आहे. महेश राठोड याची ही प्रेरणादायी वाटचाल तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण आहे की, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणताही तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो.





