Food Business : नोकरीपेक्षा बिझनेस चांगला, तरुणाने सुरू केला व्यवसाय, आता कमतोय दुप्पट पैसे!

Last Updated:

Food Business : 3 वर्षापूर्वी त्याने भावसार आस्वाद कॉर्नर या नावाने साऊथ इंडियन नाश्ता सेंटर सुरू केले. आणि आज हा तरुण महिन्याला 1 लाखापर्यंतचे उत्पन्न या व्यवसायातून घेत असतो.

+
News18

News18

नाशिक : मनात जिद्द असेल तर कुठल्याही क्षेत्रात आपले यश हे प्राप्त करता येत. याचे उत्तम असे उदाहरण जळगावमधील प्रीतेश भावसार या तरुणाचे आहे. या तरुणाने आपले शिक्षण बी.कॉममध्ये पूर्ण केल्यानंतर पुण्यामध्ये चांगल्या कंपनीत नोकरीही केली. परंतु इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय केला तर पैसेही चांगले मिळतील या विचाराने गावी परत येऊन एक छोटे साऊथ इंडियन नाश्ता सेंटर सुरू केले आहे. त्याच्या या व्यवसायातून प्रीतेश हा महिन्याला 1 लाखाच्या वर कमाई देखील करत असल्याचे त्याने लोकल 18 सोबत बोलतांना सांगितले आहे.
प्रीतेश याच्या वडिलांचे स्वप्न होते की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन चांगला पगाराची नोकरी करावी. या करता प्रीतेश याने पुण्यामधील सिहगड कॉलेजला त्याचे बी. कॉम पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यामधीलच एका खासगी कंपनीत प्रीतेश याने काम करण्यास सुरुवात केली. पण पगार हा 50 हजारापेक्षा कमी असल्यामुळे खर्च सुद्धा भगत नसल्याने प्रीतेश याने त्याच्या एका मित्रासोबत पुण्यातच अमृतुल्य सुरू केले. जेणेकरून एक साईड बिझनेस देखील करता येईल. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर पूर्ण वेळ व्यवसायाला देण्याचा निर्णय त्याने घरी सांगितलामध्यमवर्गीय कुटुंब असल्याने घरच्यांकडून सुरुवातीला विरोध होत असल्याचे प्रीतेश सांगत असतो.
advertisement
या व्यवसायातून प्रीतेश हा चांगली कमाई घेऊ लागलायामुळे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची त्याची इच्छा राहिली नाही. परंतु काही काळानंतर प्रीतेश याला त्याचा हा व्यवसाय काही कारणास्तव बंद करावा लागला. त्यातच कोरोना देखील आल्याने प्रीतेश हा पुन्हा आपल्या गावी जळगावला आलाया ठिकाणी देखील आपण आपला व्यवसाय सुरू करूया असा प्रश्न घरी मांडल्यानंतर वडिलांनी तुला ज्यात आवड आहे ते तू कर असे सांगितले. 3 वर्षापूर्वी त्याने भावसार आस्वाद कॉर्नर या नावाने साऊथ इंडियन नाश्ता सेंटर सुरू केले. आणि आज हा तरुण महिन्याला 1 लाखापर्यंतचे उत्पन्न या व्यवसायातून घेत असतो.
advertisement
इतकेच नाही तर आज हा तरुण इतरांना देखील त्याच्या या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला रोजगार देत आहेस्वतः प्रीतेश हा सर्व पदार्थ हे ताजे बनवत असतो. यात त्याला त्याचा वडिलांची आणि आईची देखील मोठी मदत असल्याचे प्रीतेश बोलतो. याच्याकडे 30 रुपये प्लेट असे मेंदूवडाक्रिस्पी मेंदूवडाइडली, फ्राय इडली, खमंग असे पदार्थ मिळत असतात. तुम्हाला जर याच्याकडेच क्रिस्पी मेंदूवडे खाण्याचे जायचे असल्यास जळगाव येथील महाबळ परिसरात याचे हे नाश्ता सेंटर आहे.
मराठी बातम्या/मनी/
Food Business : नोकरीपेक्षा बिझनेस चांगला, तरुणाने सुरू केला व्यवसाय, आता कमतोय दुप्पट पैसे!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement