शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली
गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Sanman Nidhi) योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 19 वा हप्ता वितरित करण्यात आला. त्यावेळी अनेकांना नमो शेतकरी निधीचाही हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तो न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शासनाकडे यासंदर्भात विचारणा केली जात होती.
advertisement
राज्य शासनाचा निर्णय आणि निधी वितरण
शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर केला. हा निधी ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला. अखेर 2 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, एकूण 2170 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जात आहे.
थकीत हप्ते आणि सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू
मार्च महिन्याच्या अखेरीस बँक प्रक्रियेमुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकला नव्हता. मात्र, आता शासनाने त्वरित पावले उचलत थकीत हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र वितरित करण्यास सुरुवात केली आहे.
अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी 2 ते 3 हप्ते प्राप्त झाले होते, तर काहींना एकही हप्ता मिळालेला नव्हता. काहींना 5 हप्ते मिळाले होते, मात्र उर्वरित रक्कम येणे बाकी होते. अशा सर्व शेतकऱ्यांना आता थकलेले हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र जमा होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या हप्त्याची स्थिती कशी तपासावी?
शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासता येईल.
स्टेटस तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary
"Beneficiary Status" या पर्यायावर क्लिक करा.
आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP प्राप्त होईल, तो आणि कॅप्चा कोड अचूक भरा.
"Get Data" बटणावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला खालील माहिती मिळेल –
तुमचे नाव आणि पत्ता
आतापर्यंत मिळालेले हप्ते
हप्ता न मिळाल्यास त्याचे कारण
शेतकऱ्यांनी आपला हप्ता जमा झाला आहे का? याची खातरजमा करून आवश्यक ती कारवाई करावी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.