पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर

Last Updated:

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोक आपले हटके आणि ट्रेडिंग फोटो तयार करण्यासाठी AI चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

+
पुण्यात

पुण्यात फोटो मार्फिंगद्वारे बदनामी करून खंडणी उकळण्याचा घटनेत वाढ..

पुणे: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोक आपले हटके आणि ट्रेडिंग फोटो तयार करण्यासाठी AI चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मात्र ह्याच सोशल मीडिया ट्रेंडमुळे फोटोंचा गैरवापर करून धमकी देणे, बदनामी करण्याचे प्रकार पुणे शहरात वाढले आहेत. महिला, विद्यार्थी आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांना या प्रकाराचा सर्वाधिक फटका बसत आहे. मात्र यापासून कसे सावध राहायचे आणि काय काळजी घेतली पाहिजे, याबाबतची अधिक माहिती सायबर तज्ज्ञ निरंजन भूसनाळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यात AI च्या मदतीने बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तक्रारींमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून डिजिटल सुरक्षेबाबत जागरूक राहणे गरजेचे बनले आहे.
फोटोमॉर्फिंगद्वारे एखाद्या व्यक्तीचा मूळ फोटो वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा AI तंत्रज्ञानाचा वापर करून बदलणे, त्यावर दुसऱ्या चेहऱ्याचे किंवा शरीराचे विलयन करून खोटा किंवा भ्रमिक फोटो तयार करणे. नंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकून त्या व्यक्तीची बदनामी करून खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
advertisement
काय काळजी घ्यावी?
1. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना विचार करा. वैयक्तिक किंवा खाजगी फोटो सार्वजनिक प्रोफाईलवर टाकू नका. 2. प्रोफाईलची सेटिंग मजबूत ठेवा. फेसबुक, इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्मवर प्रायव्हसी सेटिंग मजबूत ठेवा. 3. संशयास्पद लिंकवर क्लिक करण्याअगोदर व्यवस्थित तपासून घ्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोटो किंवा डाऊनलोड लिंकवर क्लिक करू नका. हे डेटा चोरीसाठी वापरले जाऊ शकते. 4. AI डिटेक्शन टूल्सचा वापर करा. इंटरनेटवर अनेक मोफत वेबसाईटस आहेत ज्या फोटो खोटा आहे की खरा आहे हे ओळखण्यात मदत करतात, त्यांचा वापर करा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement