विराटचं भारतातून पॅकअप, लंडनमध्ये झाला सेटल, दिल्लीच्या प्रॉपर्टीचे अधिकार कुणाला? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

विराट कोहली 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायच्या आधी विराट कोहली दिल्लीजवळच्या गुरुग्राममधल्या त्याच्या घरी पोहोचला.

विराटचं भारतातून पॅकअप, लंडनमध्ये झाला सेटल, दिल्लीच्या प्रॉपर्टीचे अधिकार कुणाला? समोर आली मोठी अपडेट
विराटचं भारतातून पॅकअप, लंडनमध्ये झाला सेटल, दिल्लीच्या प्रॉपर्टीचे अधिकार कुणाला? समोर आली मोठी अपडेट
नवी दिल्ली : विराट कोहली 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायच्या आधी विराट कोहली दिल्लीजवळच्या गुरुग्राममधल्या त्याच्या घरी पोहोचला. गुरुग्राममधल्या प्रॉपर्टीचे अधिकार म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नी विराटने त्याचा भाऊ विकास कोहलीच्या नावावर केलं आहे. मंगळवारी दुपारी विराट कोहली गुरुग्राममधल्या वजीराबाद तहसील कार्यालयात गेला. तिकडे जाऊन विराटने गुरुग्राममधल्या प्रॉपर्टीचं जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी भाऊ विकास कोहलीच्या नावावर केली.

विराट तहसील कार्यालयात

विराट कोहलीने तहसील कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. तसंच त्याने कर्मचाऱ्यांना ऑटोग्राफही दिल्या. विराट कोहली हा मागच्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये शिफ्ट झाला आहे, तसंच तो इंग्लंडमध्ये सेटल होणार असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे इंग्लंडला सेटल व्हायच्या आधी विराटने प्रॉपर्टीबद्दलचे कायदेशीर अधिकार भाऊ विकास कोहलीला सोपवले आहेत.
पॉवर ऑफ अटॉर्नी एक कायदेशीर दस्तावेज आहे, जो एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रॉपर्टीसंदर्भातील कायदेशीर आणि आर्थिक कार्य करण्यासाठी अधिकृत परवानगी देते. यामुळे पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेल्या व्यक्तीला बँक, मालमत्ता व्यवस्थापन, करारांवर स्वाक्षरी करणे यासारख्या आर्थिक बाबींसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो. जोपर्यंत पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली व्यक्ती हा करार रद्द करत नाही, तोपर्यंत पॉवर ऑफ अटॉर्नी मिळालेल्या व्यक्तीकडेच हा अधिकार असतो.
advertisement
विराट कोहलीने टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे तो आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर विराट पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळणार आहे. 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरूवात होणार आहे.

भारताची वनडे टीम

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल
advertisement

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजचं टाईमटेबल

19 ऑक्टोबर- पहिली वनडे, पर्थ
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे, ऍडलेड
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे, सिडनी
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराटचं भारतातून पॅकअप, लंडनमध्ये झाला सेटल, दिल्लीच्या प्रॉपर्टीचे अधिकार कुणाला? समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement