Pankaj Dheer Death : मित्राला शेवटचं पाहताना सलमान खानच्या अश्रूंचा फुटला बांध, निकितिनला घट्ट मिठी मारत केलं सांत्वन

Last Updated:

महाभारत मधील कर्ण भूमिका अजरामर केलेले पंकज धीर यांचे कॅन्सरने निधन, सलमान खान व फिरोज खान यांनी अंत्यसंस्कारास हजेरी लावली. कुटुंबात अनिता, निकितिन, कृतिका, नात.

News18
News18
मुंबई : 'महाभारत' मालिकेतील 'कर्ण' या भूमिकेमुळे अजरामर झालेले ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. बुधवारी मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या शोकाकुल प्रसंगी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने हजेरी लावत धीर कुटुंबाला आधार दिला.

सलमानने मिठी मारून केले सांत्वन

अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेला सलमान खान खूप शांत आणि गंभीर दिसत होता. त्याने दिवंगत अभिनेत्याच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सलमानने पंकज धीर यांचा मुलगा आणि अभिनेता निकितिन धीर याला घट्ट मिठी मारून धीर दिला. वडिलांच्या जाण्याने निकितिन पूर्णपणे कोसळला होता, अशा भावनिक क्षणी वडिलांच्या मित्राचा मिळालेला आधार त्याला खूप मोलाचा ठरला.
advertisement
advertisement

पंकज आणि सलमान यांचे जुने नाते

पंकज धीर आणि सलमान खान यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध जुने आहेत. पंकज धीर यांनी सलमान खानसोबत 'सनम बेवफा' आणि 'तुमको ना भूल पाएंगे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. विशेष म्हणजे, निकितिन धीरनेही सलमान खानसोबत 'रेडी' आणि 'दबंग २' या गाजलेल्या चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे.
advertisement
advertisement
पंकज धीर यांच्या अंतिम संस्कारासाठी 'महाभारत'मध्ये 'अर्जुन'ची भूमिका साकारणारे त्यांचे सहकलाकार फिरोज खान यांनीही हजेरी लावली होती.

६८ व्या वर्षी कॅन्सरने घेतले प्राण

मीडिया रिपोर्टनुसार, पंकज धीर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर निधन झाले. 'महाभारत'मधील कर्णासोबतच त्यांनी शाहरुख खानच्या 'बादशाह', बॉबी देओलच्या 'सोल्जर', अक्षय कुमारच्या 'अंदाज' आणि अजय देवगणच्या 'टारझन: द वंडर कार' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता धीर, मुलगा निकितिन धीर, सून अभिनेत्री कृतिका सेंगर आणि ३ वर्षांची नात असा परिवार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pankaj Dheer Death : मित्राला शेवटचं पाहताना सलमान खानच्या अश्रूंचा फुटला बांध, निकितिनला घट्ट मिठी मारत केलं सांत्वन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement