Krushi Market Today: सोयाबीन- कांद्याची आवक वाढली, दर घसरले, आजचे भाव काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
बुधवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.
मुंबई: बुधवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याची आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 16 हजार 485 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी धुळे मार्केटमध्ये 8 हजार 002 क्विंटल सर्वाधिक मका आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1165 ते जास्तीत जास्त 1876 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 354 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 78 हजार 407 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 09 हजार 355 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 285 ते जास्तीत जास्त 1374 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल कांद्यास 1600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1000 क्विंटल पांढर्या कांद्यास 1875 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन उत्पादकांची कोंडी: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 32 हजार 560 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 34 हजार 051 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3375 ते 4150 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 655 क्विंटल पांढर्या सोयाबीनला 4200 ते 4600 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. हिंगोली मार्केटमध्ये सर्वात कमी 76 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 3700 ते 4000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
advertisement
खरिप वाचवणारे अडचणीत: यंदाच्या अतिवृष्टीतून पिके वाचवणे अगदी कठीण होते. अशा स्थितीत देखील शेतकऱ्यांनी पिके काही प्रमाणात वाचवली आहेत. रब्बीची तयारी आणि दिवाळी सारखा सण तोंडावर असताना वाचवलेली पिके शेतकरी मार्केटमध्ये पोहचवत आहेत. मात्र पिकांचे दर गडगडलेले असल्याने खरीप वाचवणारे शेतकरी अडचणीत कायम आहेत.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 15, 2025 8:51 PM IST