सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यात AI च्या मदतीने बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तक्रारींमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून डिजिटल सुरक्षेबाबत जागरूक राहणे गरजेचे बनले आहे.
Weather Alert: तुफान आलंया! गुरुवारी राज्यात जोरदार पाऊस कोसळणार, 13 जिल्ह्यांना अलर्ट
फोटोमॉर्फिंगद्वारे एखाद्या व्यक्तीचा मूळ फोटो वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा AI तंत्रज्ञानाचा वापर करून बदलणे, त्यावर दुसऱ्या चेहऱ्याचे किंवा शरीराचे विलयन करून खोटा किंवा भ्रमिक फोटो तयार करणे. नंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकून त्या व्यक्तीची बदनामी करून खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
advertisement
काय काळजी घ्यावी?
1. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना विचार करा. वैयक्तिक किंवा खाजगी फोटो सार्वजनिक प्रोफाईलवर टाकू नका. 2. प्रोफाईलची सेटिंग मजबूत ठेवा. फेसबुक, इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्मवर प्रायव्हसी सेटिंग मजबूत ठेवा. 3. संशयास्पद लिंकवर क्लिक करण्याअगोदर व्यवस्थित तपासून घ्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोटो किंवा डाऊनलोड लिंकवर क्लिक करू नका. हे डेटा चोरीसाठी वापरले जाऊ शकते. 4. AI डिटेक्शन टूल्सचा वापर करा. इंटरनेटवर अनेक मोफत वेबसाईटस आहेत ज्या फोटो खोटा आहे की खरा आहे हे ओळखण्यात मदत करतात, त्यांचा वापर करा.