पीएम किसानचा हप्ता जमा
याआधी नुकतेच नरेंद्र यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२वा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. आता या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
आठव्या हप्त्यासाठी १,७७४ कोटींची मंजुरी
शासनाच्या निर्णयानुसार, ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी असलेल्या आठव्या हप्त्यासाठी सुमारे १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
हा निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, येत्या ३ ते ४ दिवसांत हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत सात हप्ते वितरित
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी पहिला ते सातवा हप्ता यशस्वीपणे वितरित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होते. आता आठव्या हप्त्यालाही मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लवकरच खात्यात पैसे जमा
शासनाकडून निधी वितरणाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे संबंधित यंत्रणा लवकरच पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा होऊन त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
