TRENDING:

रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video

Last Updated:

Inspiring Story: केरळमधील लीला ईसो यांनी मागील 23 वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षण, संस्कार आणि सुरक्षित आयुष्य देण्याचं कार्य हाती घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: समाजात अनेक स्तरांवर प्रगती होत असली तरी काही घटक आजही उपेक्षितच राहिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुलं. या मुलांना बालपणापासूनच तिरस्कार, असुरक्षितता आणि शिक्षणापासून दूर राहण्याची वेळ येते. मात्र अशा परिस्थितीत या मुलांसाठी आशेचा किरण बनल्या त्या केरळमधील सामाजिक कार्यकर्त्या लीला ईसो. मागील तब्बल 23 वर्षांपासून त्या या मुलांच्या आयुष्यात मायेचा आधार बनून उभ्या आहेत.
advertisement

नागपूरमधील रेडलाईट परिसरात राहणाऱ्या महिलांच्या मुलांना सुरक्षित वातावरण आणि शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने लीला ईसो यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी समर्पित केलं. त्यांनी सुरू केलेल्या ‘शरणस्थान’ या संस्थेमार्फत आज शेकडो मुलांना निवारा, शिक्षण आणि आत्मविश्वास मिळाला आहे.

शेकडो मुलांना मिळाला नवा मार्ग

या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलं आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. काही जण उच्च शिक्षण घेत आहेत, तर काही स्वतःच्या पायावर उभे राहत समाजात मानाने जीवन जगत आहेत. सध्या या निवासी संस्थेत शंभरहून अधिक मुलं राहून शिक्षण घेत आहेत. येथे त्यांना केवळ शैक्षणिक मदतच नव्हे, तर प्रेम, आधार आणि सन्मानाने जगण्याचे संस्कार दिले जातात.

advertisement

तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला यशस्वी प्रयोग?

रेडलाईट परिसरातून सुरू झाला प्रवास

लीला ईसो या मूळ केरळमधील असून पती ईसो डॅनियल यांच्यासोबत त्या नागपूरला आल्या होत्या. सामाजिक समुपदेशनाच्या कामानिमित्त त्या गंगा-जमुना परिसरात गेल्या असताना तेथील परिस्थिती पाहून त्यांना धक्का बसला. विशेषतः त्या महिलांच्या लहान मुलांचे आयुष्य अंधारात जात असल्याचं त्यांना प्रकर्षाने जाणवलं. याच क्षणापासून त्यांनी या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी रेडलाईट परिसरात एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि तिथूनच मुलांना शिक्षण देण्याची सुरुवात केली. पुढे या कार्याचं रूपांतर ‘शरणस्थान’ या संस्थेत झालं.

advertisement

संपत्ती आणि दागिनेही विकले

या कार्यासाठी सुरुवातीला आर्थिक साधनांची मोठी अडचण होती. मात्र मुलांच्या भविष्यासाठी लीला आणि त्यांच्या पतीने मोठा त्याग केला. केरळमधील मालमत्ता विकली, इतकंच नव्हे तर अंगावरील दागिने देखील विकून त्यांनी संस्थेचा पाया मजबूत केला.

अडचणी आणि धमक्यांनाही न जुमानता काम सुरू

या कार्याला सुरुवात करताना अनेक अडथळे आले. काही समाजविघातक घटकांकडून धमक्या आणि दबावही टाकण्यात आला. तरीही लीला ईसो मागे हटल्या नाहीत. त्यांच्या ध्येयापुढे सर्व संकटं त्यांनी धैर्याने पार केली.

advertisement

पतीची कायम साथ

या प्रवासात त्यांचे पती ईसो डॅनियल यांची मोठी साथ लाभली. प्रत्येक कठीण टप्प्यावर त्यांनी पत्नीच्या कार्याला पाठिंबा दिला. त्यांच्या सहकार्यामुळेच हे काम अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाऊ शकले.

आजाराशी लढतानाही सेवा सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

इतक्या वर्षांच्या सेवाकाळात लीला ईसो यांना कर्करोगासारख्या गंभीर आजारालाही सामोरं जावं लागलं. मात्र आजारानेही त्यांची जिद्द कमी केली नाही. उपचार सुरू असतानाही त्या संस्थेतील मुलांची काळजी घेत राहिल्या. आज ‘शरणस्थान’ ही संस्था अनेक वंचित मुलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. समाजाने दुर्लक्षित केलेल्या या मुलांना सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य देण्याचं काम लीला ईसो सातत्याने करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल