मोजणीच्या वाढलेल्या शुल्कामुळे शेतकरी हवालदिल
मोजणी प्रक्रियेतील गतिमानतेचा फायदा होण्याऐवजी, शुल्कात दुप्पट ते पाचपट वाढ झाल्याने सामान्य शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतीचे लहान तुकडे होत असल्याने वाद वाढत आहेत, तर नागरीकरणामुळे शहरालगतच्या जमिनींवर नव्या इमारती, कॉम्प्लेक्स उभ्या राहत आहेत. परिणामी, जमिनीच्या सीमांकन प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतमोजणीच्या अर्जांमध्ये वाढ,पण यंत्रणा अपुरी
advertisement
शहरालगतच्या शेतीच्या मोजणीसाठी दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया वेगवान झाली असली तरी रोव्हर यंत्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात.
नवे शुल्क किती?
मोजणीच्या नव्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे:
मोजणीचा प्रकार मागील दर नवीन दर
नियमित मोजणी 1,000 2,000
तातडीची मोजणी 3,000 8,000
दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी नियमित मोजणी ₹2,000, तर तातडीची 8,000 रुपये करण्यात आली आहे. दोन हेक्टरहून अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 2,000 रु द्यावे लागत आहेत.
दर महिन्याला हजारो अर्ज,पण निर्णय लांबणीवर
सध्या महिन्याला 1,200 ते 1,300 मोजणीसंबंधी अर्ज दाखल होत आहेत. मात्र, यंत्रणेची अपुरी संख्या आणि वशिलेबाजीमुळे सर्व अर्ज निकाली निघत नाहीत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
