TRENDING:

१९ नोव्हेंबरला PM Kisan चा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार! कारण आलं समोर

Last Updated:

PM Kisan 21 Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून, देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून, देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बिहार निवडणुकीमुळे स्थगित ठेवलेला हा हप्ता आता १९ नोव्हेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
pm kisan yojana
pm kisan yojana
advertisement

कुणाला मिळणार पैसे?

२१ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या औपचारिकता वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची नोंदणी, कागदपत्रे किंवा बँक तपशीलांमध्ये त्रुटी असतील, त्यांना हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे १९ नोव्हेंबरपूर्वी खालील कामे पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केलं आहे.

ई-केवायसी

पीएम किसानमध्ये ई-केवायसी अनिवार्य आहे. ई-केवायसी अपडेट नसल्यास हप्ता अडकू शकतो.

advertisement

बँक खात्याची स्थिती तपासा

आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, खाते सक्रिय आहे का, IFSC कोडमध्ये बदल झाला आहे का? ही माहिती तपासणे महत्त्वाचे.

जमिनीच्या नोंदी पडताळणी

शेतकऱ्याचे नाव सातबारा किंवा इतर जमीन नोंद दस्तावेजांमध्ये योग्यरीत्या नोंदलेले असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती असल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.

सरकारचे म्हणणे आहे की सर्व कागदपत्रे योग्य असल्यास शेतकऱ्यांना २,००० रुपयांचा २१ वा हप्ता कोणताही विलंब न होता मिळेल. त्यामुळे लाभार्थींनी घोषणा केलेल्या तारखेपूर्वी सर्व माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.

advertisement

तुम्हाला २१ वा हप्ता मिळणार आहे का? कसं चेक कराल?

१) अधिकृत वेबसाइटला भेट द्या

सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in येथे जा.

२) 'लाभार्थी स्थिती' पर्याय निवडा

होमपेजवरील 'Beneficiary Status' किंवा 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करा.

३) आवश्यक माहिती भरा

आपण आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी कोणताही पर्याय निवडून माहिती भरू शकता.

advertisement

४) ‘Get Data’ वर क्लिक करा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळच्या चहाला आयुर्वेदिक पर्याय, रोज प्या वेलचीचे पाणी, फायदे पाहाल तर थक्क
सर्व पहा

त्यानंतर तुमच्या नावासहित हप्ता जमा झाला आहे की नाही, तुमची पात्रता, अर्जाची स्थिती आणि पेमेंटची माहिती स्क्रीनवर दिसेल.

मराठी बातम्या/कृषी/
१९ नोव्हेंबरला PM Kisan चा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार! कारण आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल