सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ वा हप्ता आधीच जारी केला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा हप्ता वितरित केला. या वेळी ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या, त्यात ८५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश, बँक खात्यात थेट १७१ रु कोटी रुपये जमा करण्यात आले. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेअंतर्गत एकूण ४,०५२ रु कोटींचा लाभ मिळाला आहे.
advertisement
पीएम-किसान योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. २०१९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या योजनेची घोषणा केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्रत्यक्षात आणली. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचा शेतीवरील ताण कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रु म्हणजेच वर्षभरात एकूण ६,००० रु थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात. सध्या ही योजना जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून ओळखली जाते.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ?
ऑगस्ट २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० वा हप्ता जमा केला, ज्यामुळे ९.८ कोटी शेतकऱ्यांना, त्यात २.४ कोटी महिला शेतकरी समाविष्ट आहेत, लाभ मिळाला. मागील हप्ता थोडा उशिरा मिळाल्याने शेतकरी आता २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत. जसे की, भारतीय नागरिक असावा, स्वतःच्या नावावर शेतीची जमीन असावी.लहान किंवा सीमांत शेतकरी असावा. निवृत्त सरकारी कर्मचारी किंवा १०,००० पेक्षा जास्त पेन्शनधारक नसावा. आयकर भरलेला नसावा.संस्थात्मक जमीनधारक नसावा
ई-केवायसी अनिवार्य
पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ओटीपी-आधारित ई-केवायसी करू शकतात. बायोमेट्रिक ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधावा.
लाभार्थी स्थिती कशी तपासावी?
pmkisan.gov.in संकेतस्थळाला भेट द्या. पृष्ठाच्या उजव्या बाजूस असलेल्या ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करा. आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. ‘Get Data’ वर क्लिक करा. तुमची लाभार्थी स्थिती स्क्रीनवर दिसेल.
