योजनेचा उद्देश
लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खत आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी थोडा आधार मिळावा, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेचे २० हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि आता शेतकरी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
21 वा हप्ता कधी येणार?
advertisement
यावर्षी पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता लवकरच येणार आहे. गेल्या महिन्यात, २६ सप्टेंबर रोजी, केंद्र सरकारने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील सुमारे २७ लाख शेतकऱ्यांना हा हप्ता दिला होता. कारण, पावसामुळे आणि भूस्खलनामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
इतर राज्यांतील शेतकऱ्यांना मात्र अजूनही हा हप्ता मिळालेला नाही. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, हा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी होण्याची शक्यता आहे. तथापि, अनेक माध्यमांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, दिवाळीपूर्वीच हा २१ वा हप्ता जाहीर होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
तुम्हाला हप्ता मिळणार का?
जर तुम्हाला २१ वा हप्ता मिळणार आहे का? हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमची स्थिती ऑनलाईन तपासू शकता. सर्वप्रथम, PM Kisan योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. होमपेजवर तुम्हाला “Beneficiary List” (लाभार्थी यादी) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर, तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. शेवटी, “Get Report” (अहवाल मिळवा) या बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या नावासमोर तुम्हाला माहिती दिसेल. तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी पात्र आहात की नाही. जर तुमचं नाव लाभार्थी यादीत असेल, तर तुमच्या खात्यात लवकरच पैसा जमा होईल.
हप्ता न मिळाल्यास काय करावे?
जर हप्ता जमा झाला नसेल,तर तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा PM Kisan हेल्पलाइन (155261 / 011-24300606) वर फोन करून माहिती घेऊ शकता.