पेपरमधील जाहिरातीने झाली सुरुवात
रोहिणी पाटील यांच्या आयुष्याला पेपरमधील छोट्या जाहिरातीने दिशा दिली. जाहिरात होती मधमाशी पालन शिकवणाऱ्या कोर्सची. त्या वेळी या क्षेत्राबद्दल त्यांना फारसे माहित नव्हते. पण जाहिरात वाचताच मधमाशी पालनाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. मात्र काही कारणास्तव त्यांना कोर्स करता आला नाही.
पुढे जाऊन रोहिणी यांनी त्यांच्या गावातील 35 महिलांना एकत्र केले आणि महाबळेश्वरमधील एका प्रशिक्षण संस्थेला सुळेवाडीतच मधमाशी पालनाचा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्याची विनंती केली. या कार्यशाळेमध्ये त्यांनी लाकडी पेट्यांमध्ये ठेवलेल्या मधमाशी वसाहतींची काळजी कशी घ्यावी? त्यांना योग्य वातावरण कसे द्यावे? मध व मेण कसे काढावे? याची माहिती घेतली. या प्रक्रियेदरम्यान रोहिणी यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग दिसला.
advertisement
1.5 लाखांचे कर्ज घेतले
प्रशिक्षण घेतल्यानंतर मधमाशी पालनासाठी कमी जागा, कमी भांडवल लागत लागते.आणि मोठ्या प्रमाणात नफा कमावता येईल हे त्यांच्या रोहिणी यांच्या लक्षात आले. पण त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठलेही भांडवल नव्हते. तरी त्यांनी हार मानली नाही. दागिने गहाण ठेवून 1.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि 35 मधमाशी पेट्या विकत घेतल्या.
सुरवातीला अपयश आलं
सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. मधमाश्यांचे दंश, काहीवेळा पोळ्यांचे नुकसान, कामात येणारे अपयश. या सर्व आव्हानांनी तिची परीक्षा घेतली. लोकांचाही संशय होता की हा व्यवसाय चालेल का? पण रोहिणीने संयमाने शिकत राहणे, चुका सुधारत राहणे आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहण्याचा निर्णय घेतला. काळ जसा पुढे गेला. तसतशी तिची मेहनत फळाला येऊ लागली.
वर्षाला 25 लाखांचे उत्पन्न
आज रोहिणी पाटील या 100 पेक्षा जास्त मधमाशी पेट्या सांभाळते. या पेट्यांतून दरवर्षी जवळपास 900 किलो शुद्ध, सेंद्रिय मध तयार होते. हे मध बाजारात चांगल्या दरात विकला जातो आणि त्यामुळे रोहिणीला दरवर्षी सुमारे 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
मधाला प्रचंड मागणी
भारतामध्ये मध उत्पादनाची बाजारपेठही झपाट्याने वाढत आहे. अंदाजानुसार, 2033 पर्यंत भारतातील मध बाजारपेठेत 68,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे रोहिणीसारख्या महिला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
