केळी: राज्याच्या मार्केटमध्ये आज 174 क्विंटल केळीची आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1500 ते 3750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर टिकून: गेल्या महिनाभरापासून बाजारात शेवग्याची आवक अतिशय कमी होत आहे. अशातच मागणी अधिक असल्याने शेवग्याचे दर टिकून आहेत. राज्याच्या मार्केटमध्ये आज 67 क्विंटल शेवग्याची आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 11500 ते 25000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाची आवक दबावातच: आज राज्याच्या मार्केटमध्ये 293 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 227 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 2500 ते 16000 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल उत्तम प्रतीच्या डाळिंबास प्रतीनुसार 10000 ते 20000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.