रेड्यामुळेच मिळाली देशभर प्रसिद्धी
मुरा जातीचा असणाऱ्या गजेंद्र रेड्याला चार दिवसांचा असताना 1 लाखाची मागणी होती. तसेच हरियाणातील प्रसिद्ध उत्पादकांनी काही वर्षांपूर्वी तब्बल दीड कोटीला मागितला होता. मात्र, "गजेंद्रला आम्ही विकणार नाही. त्यानं आमचं नशिब चमकवलय. त्याच्यामुळेच आम्हाला धन-दौलत अन् देशभर मान मिळतोय," असे रेडा मालक कृतज्ञतेने सांगतात.
advertisement
मुरा प्रजात पैदाशीसाठी वापर
विलास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार; काही वर्षांपूर्वी विलास नाईक यांचे वडील गणपती नाईक यांनी हरियाणावरून दीड लाखांची हरियाणा मुरा म्हैस विकत आणली होती. त्या म्हैशीपासून त्यांना हा गजेंद्र रेडा मिळाला. अत्यंत जातीवंत मुरा वंशातील असल्याने चार दिवसांचा असतानाच या रेड्याला एक लाखाची मागणी झाली होती. परंतु हौशी पशुपालक गणपती नाईक यांनी रेडा सांभाळायचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे नशीब पालटले.
अत्यंत काळजीपूर्वकपणे रेडा-म्हशींचे पालन करून आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल पन्नास जातिवंत म्हशी आणि हिंदकेसरी गजेंद्र रेड्याचा वंश बाहुबली रेडा देखील आहे. घरच्या गोठ्यातील पैदाशीसह त्यांनी बाहेरील म्हैस पैदाशीतून आर्थिक उत्पन्न उभा केले आहे. याशिवाय आजवर 22 प्रदर्शनातून फिरलेला गजेंद्र रेडा प्रत्येक प्रदर्शनासाठी लाखभर रुपयांचे मानधन मिळवून देतोय.
रोज दोन हजाराचा खुराक
दीड टन वजनाच्या रेड्याला रोज 15 लिटर म्हैशीचे दूध, 3 किलो सफरचंद, 3 किलो आटा आणि 4 किलो पेंड खाद्य घालतात. यासह त्याला रोज लागणारा ऊस, मका, गवत असा चारा देखील वेगळा असल्याचे रेडा मालक ज्ञानेश्वर विलास नाईक सांगतात.
दरम्यान, दररोज 15 लिटर दूध पिणारा दीड कोटींचा बहुचर्चित गजेंद्र रेडा शेतकऱ्यांचे आकर्षण ठरतोय. तब्बल 12 वेळा हिंद केसरी ठरलेल्या गजेंद्रची शरीरयष्टी पाहून आणि आहार ऐकून हा रेडा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरतोय.





