मोहोळ तालुक्यातील यावली येथील तरुण शेतकरी अनिकेत प्रभाकर दळवे यांनी तीन एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकरात जवळपास 1300 ते 1400 झाडांची लागवड केली आहे. जवळपास पाच वर्षांपासून तरुण शेतकरी अनिकेत हे डाळिंबाची शेती करत आहेत. डाळिंबाची लागवड करून बागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले.
advertisement
डाळिंबावर मर रोग, तेली रोग पडू नये यासाठी अनिकेतने विशेष काळजी घेतली. चार ते पाच दिवसाला डाळिंबावर स्प्रे द्वारे फवारणी करण्यात येत होती. जर पाऊस पडला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डाळिंबावर फवारणी करण्यात येत होती. डाळिंबावर मर रोग होऊ नये म्हणून डाळिंबाच्या खोडापासून औषधे देण्यात येत होते आणि बुडांवर स्प्रे सुद्धा मारण्यात येत होता.
अनिकेत दळवी यांनी डाळिंबाची विक्री सोलापूर, हैदराबाद, गुलबर्गा, पंढरपूर येथे पाठवली आहे. तसेच इंदापूर येथील मार्केटला सुद्धा डाळिंबाची विक्री केली असून इंदापूर मधील मार्केटमध्ये डाळिंबाला चांगला दर मिळाला आहे. जवळपास इंदापूर मार्केटमध्ये अनिकेत यांच्या डाळिंबाला 450 किलो प्रमाणे दर मिळाला आहे. एकरात लागवड केलेल्या डाळिंबाची आतापर्यंत दोन तोडे झाले. जवळपास चार टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले आहे.
तीन एकरात डाळिंबाची लागवड करण्यासाठी एकरी अनिकेत दळवी यांना एकरी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून एकरी दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न तरुण शेतकरी अनिकेत दळवी यांना मिळाले आहे. व्यवसाय करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे नसून शिक्षण घेऊन सुद्धा व्यवसायात डोकं लावले तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी अनिकेत दळवे यांनी दिला आहे.