Success Story: पुण्यात कोर्डिसेप्स मशरूमची कंटेनर शेती, शैलेश यांचा यशस्वी प्रयोग, किलोला तब्बल 70 हजार भाव, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Success Story: शैलेश मोडक यांनी वारजे परिसरात कंटेनरच्या साहाय्याने ही आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती सुरू केली असून, अल्पावधीतच त्यांना चांगले यश मिळाले आहे.
पुणे : पारंपरिक शेतीला नवा पर्याय ठरत असलेल्या कंटेनर शेतीमध्ये आता कोर्डिसेप्स मशरूमच्या उत्पादनाची यशस्वी सुरुवात पुण्यातील शैलेश मोडक यांनी केली आहे. त्यांनी वारजे परिसरात कंटेनरच्या साहाय्याने ही आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती सुरू केली असून, अल्पावधीतच त्यांना चांगले यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, कोर्डिसेप्स मशरूमची बाजारातील किंमत किलोला तब्बल 70 हजार ते 1 लाख रुपये इतकी आहे.
शैलेश मोडक यांनी सुरुवातीला सामान्य प्रकारच्या मशरूमची शेती कंटेनरमध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी कोर्डिसेप्स मशरूमच्या उत्पादनात प्रयोग केला आणि त्यातही यश मिळवले. हे मशरूम बॉटलमध्ये पूर्णतः स्वच्छ आणि हायजेनिक वातावरणात विकसित केले जाते. चीन आणि जपानमध्ये या मशरूमला चायनीज हर्ब म्हणून ओळखले जाते, कारण यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक घटक आढळतात.
advertisement
कोर्डिसेप्स मशरूमला एनर्जी बूस्टर, अँटी-कॅन्सर, तसेच किडनीसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, हे मशरूम अडीच महिन्यांत तयार होते आणि अगदी 10 x 10 फूट जागेत देखील त्याचे उत्पादन घेता येते. त्यामुळे शहरांमध्ये लहान जागांमध्ये शेती करण्याची उत्तम संधी यातून निर्माण झाली आहे.
advertisement
शैलेश मोडक सांगतात, ही शेती कंटेनरमध्ये केल्यामुळे ती कुठेही हलवता येते. यासाठी केवळ 22 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असून, कंटेनरमध्ये हे तापमान सहज राखता येते. त्यामुळे बंदिस्त जागेतही कोर्डिसेप्सची शेती शक्य आहे. त्यांनी यापूर्वी सामान्य मशरूमच्या उत्पादनातून अनुभव घेतला असून, त्याच अनुभवाच्या आधारे त्यांनी या नव्या प्रयोगाला सुरुवात केली.
advertisement
कोर्डिसेप्स मशरूमची शेती पूर्णतः शास्त्रीय पद्धतीवर आधारित आहे. यासाठी योग्य तापमान नियंत्रण, स्वच्छता, वायुवीजन, आणि बॉटलमध्ये योग्य प्रमाणात पोषणद्रव्यांचा वापर केला जातो. ही शेती कोणत्याही रासायनिक खतांशिवाय केली जाते, त्यामुळे ती पर्यावरणपूरकही ठरते. शहरांमध्ये शेती करणे अशक्य मानले जात होते, पण मोडक यांचा हा प्रयोग शहरी शेतीच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jul 28, 2025 8:26 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story: पुण्यात कोर्डिसेप्स मशरूमची कंटेनर शेती, शैलेश यांचा यशस्वी प्रयोग, किलोला तब्बल 70 हजार भाव, Video







