TRENDING:

60 झाडांची लागवड, सेंद्रिय शेती पद्धतीचा फायदा, सोलापुरातील शेतकरी झाला लखपती!

Last Updated:

सध्याच्या घडीला शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना पाहिला मिळत आहेत. शेतकरी शशिकांत पुदे सेंद्रिय पद्धतीने चिकूची शेती करत असून त्यांना वर्षाला लाखोंची कमाई होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी 
advertisement

सोलापूर : - सध्याच्या घडीला शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना पाहिला मिळत आहेत. सेंद्रिय शेती केली तर नक्कीच फायदा मिळतो. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव गावातली शेतकरी शशिकांत पुदे यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. 21 वर्षांपूर्वी 60 चिकूच्या झाडांची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली होती. आज दर वर्षाला चिकूच्या विक्रीतून शशिकांत पुदे यांना 5 ते 7 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळत आहे.

advertisement

मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव गावातली शेतकरी शशिकांत पुदे यांनी 21 वर्षांपूर्वी 60 चिकूच्या झाडांची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली होती. पुदे यांनी कालीपत्ती या जातीच्या चिकू लागवडीची लागवड केलेली आहे. एका चिकूच्या झाडांपासून 500 ते 600 किलो उत्पन्न मिळत आहे. चिकू लागवडीतून 5 ते 7 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर एकदा लागवड केलेल्या सेंद्रिय चिकूच्या माध्यमातून शेतकरी शशिकांत पुदे यांना आतापर्यंत 25 ते 30 लाखांचे उत्पन्न झालं आहे.

advertisement

कांद्याच्या शेतीतं पैशाचं आंतरपीक, 5 हजारांच्या खर्चात लाखांची कमाई, नेमकं काय केलं?

तसेच शेज बाभूळगाव येथील शशिकांत पुदे यांनी काजळी खिलार गाईंचा गोठा उभारला आहे. जातीवंत दुधाळ गाई आणि वळू त्यांच्या गोठ्यात आहेत. बाजारपेठ लक्षात घेता त्यांनी दूध विक्रीसह तूप निर्मितीवर भर दिला. याचबरोबरीने राज्यभरातून कालवड आणि वळूला चांगली मागणी आहे. शशिकांत पुदे हे काजू, चिकू, पेरू आणि आंबा उत्पादक प्रयोगशील शेतकरी. अलीकडेच त्यांना राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्याकडे देशी गाईंचा गोठा वडिलोपार्जित आहे. शेती विकासाबरोबरीने त्यांनी काजळी खिलार गाईंची संख्याही वाढविली.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
60 झाडांची लागवड, सेंद्रिय शेती पद्धतीचा फायदा, सोलापुरातील शेतकरी झाला लखपती!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल