सोलापूर: सोलापुरात 54 वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन 2024 भरले आहे. यामध्ये काही प्राणी आणि पक्षी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. असाच एक बोकड पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय. चायना झिंग जातीचा हा सुलतान बोकड सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. सांगलीतील कवठेमहांकाळचे राकेश कोळेकर यांचा हा बोकड असून त्याला तब्बल 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत मागणी होतेय.
advertisement
बकरी ईद सणानिमित्त राकेश कोळेकर हे मुंबई फिरण्यासाठी मित्रांसोबत गेले होते. त्यांना तिथे चायना झिंग बोकड दिसला. तेव्हा 3 महिन्याचा बोकड दीड लाख रुपयांना विकत घेतला. आपल्याकडे दमट वातावरण आहे तर चायना येथे बर्फाळ प्रदेश आल्याने या बोकडाला जास्त केस आहे. सुलतानला पंखा आणि कुलर सुध्दा बसवण्यात आला आहे. सुलतानला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मक्का, शेंगपेंड आणि हिरवा चारा खाण्यासाठी देतात, असे कोळेकर यांनी सांगितले.
कधी पाहिली का 3 फुटांची म्हैस, राधाची किंमती ऐकून व्हाल हैराण
8 लाखांना मागणी
‘चायना झिंग’ जातीचा सुलतान बोकडला सात ते आठ लाख रुपयाला विकत घेण्याची मागणी देखील केली होती. सोलापुरातील कृषी प्रदर्शनात चायना झिंग जातीचा सुलतान बोकड आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. कृषी प्रदर्शनातील या सुलतान सोबत सेल्फी काढण्यासाठी प्रदर्शनाला आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होतेय.
दरम्यान, सोलापूर शहरातील होम मैदानावर हे कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात शेती, औद्योगिक, गृहपयोगी, खाद्यसंस्कृती असे 100 हून अधिक स्टॉल आहेत. तसेच या कृषी प्रदर्शनामध्ये बुटकी म्हैस, सर्वात मोठा सहा किलोचा कोंबडा, चायना झिंग बोकड असे विविध प्राणी व पक्षी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.