TRENDING:

राज्य सरकारकडून या साखर कारखान्यांना मोठा दिलासा! भांडवली कर्ज मंजूर

Last Updated:

Agriculture News : सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्याला खेळत्या भांडवलासाठी तब्बल 402 कोटी 90 लाख रुपयांच्या मार्जिन मनी कर्जाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनंतनगर, निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलासाठी तब्बल 402 कोटी 90 लाख रुपयांच्या मार्जिन मनी कर्जाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे (NCDC) सादर करण्यात येणार आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

राजगड कारखान्याला मोठा आधार

राजगड सहकारी साखर कारखान्याने एकूण 499 कोटी 15 लाख रुपयांच्या मार्जिन मनी कर्जाची मागणी केली होती. त्यापैकी 402 कोटी 90 लाख रुपयांना राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला. या निधीचा वापर पुढील कामांसाठी होणार आहे. जसे की,

साखर प्रकल्प आधुनिकीकरण व विस्तारिकरण, आसवणी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायो CBG प्रकल्प उभारणीसाठी 327 कोटी 25 लाख रुपये

advertisement

विविध बँकांचे थकीत कर्ज फेडण्यासाठी 65 कोटी 23 लाख रुपये

यंत्रसामग्री दुरुस्ती व देखभालीसाठी 8 कोटी 42 लाख रुपये

मंजुरीच्या अटी काय आहेत?

राजगड साखर कारखान्याला मंजुरी देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत जसे की, प्रकल्प विस्तारासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी घेणे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पूर्वपरवानगी मिळवणे. शासनाच्या 25 जून 2025 रोजीच्या निर्णयातील अटींचे पालन करणे. या अटींची पूर्तता केल्यानंतरच प्रस्तावावर पुढील कार्यवाही होणार आहे.

advertisement

केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास कर्ज

राजगडसोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास 39 कोटी 88 लाख रुपयांचे मुदत कर्ज राज्य सहकारी बँकेकडून घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या कर्जासाठी महत्त्वाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.

कारखान्याच्या संचालक मंडळास वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी राहील.

कर्ज वितरणापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल.

advertisement

शासन हमी देणार आहे, मात्र सर्व अटींचे काटेकोर पालन करावे लागेल.

शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

या मंजुरींमुळे दोनही साखर कारखान्यांना आर्थिक बळ मिळणार असून उत्पादनक्षमता वाढवणे, थकीत कर्जाचा बोजा कमी करणे आणि नव्या प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती साधणे शक्य होणार आहे. साखर उद्योगात आधुनिकीकरण व विविधीकरण होणं ही काळाची गरज आहे. विशेषतः बायो-CBG आणि सहवीज प्रकल्पांमुळे कारखान्यांना स्थिर उत्पन्नाचे स्रोत मिळतील, ज्याचा फायदा अप्रत्यक्षपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही होईल.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
राज्य सरकारकडून या साखर कारखान्यांना मोठा दिलासा! भांडवली कर्ज मंजूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल