अनुदान देण्याचे स्वरूप कसे आहे?
5,10, 15, 20 व 25 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रुपये 3500/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अनुदान देते . एका लाभार्थ्याला 25 मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.
Farm Land Rules : स्वत:चा हक्क असतानाही शेतजमीन मिळत नाही का? कायदेशीर पद्धतीने जमिनीची खाते फोड कशी करावी? जाणून घ्या माहिती
advertisement
पात्रता काय आहे?
1) शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. 7/12 वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
2) शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
3) सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
7/12 उतारा
8 अ
आधार कार्डाची छायांकित प्रत
आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र.
अर्ज कसा कराल?
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक असते.