TRENDING:

Farmer Success Story: नोकरी सोडली, फक्त 20 गुंठ्यांमध्ये सुरू केला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा

Last Updated:

बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील 25 वर्षीय तुषार पवार यांनी आपल्या मेहनतीच्या आणि योग्य निर्णयाच्या जोरावर अल्पावधीतच यश संपादन केलं आहे. मागील वर्षापासून त्यांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला असून सध्या 15 ते 20 गुंठ्यांमध्ये फुलझाडे, फळझाडे आणि शोभिवंत वनस्पतींची उत्पादन घेतली जात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: शेतकरी सध्या शेतीत नव नवीन प्रयोग करत आहेत. बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील 25 वर्षीय तुषार पवार यांनी आपल्या मेहनतीच्या आणि योग्य निर्णयाच्या जोरावर अल्पावधीतच यश संपादन केले आहे. मागील वर्षापासून त्यांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला असून सध्या 15 ते 20 गुंठ्यांमध्ये फुलझाडे, फळझाडे आणि शोभिवंत वनस्पतींचे उत्पादन घेतले जात आहेत. तुषार यांची ही नर्सरी गावातच नव्हे तर आसपासच्या भागातही लोकप्रिय ठरत आहे.
advertisement

तुषार पवार यांनी सुरुवातीला एका खाजगी ठिकाणी 16 ते 17 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी केली. मात्र, त्या पगारामध्ये घरखर्च चालवणे कठीण जात होते. यामुळे त्यांनी नोकरीस पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला. एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी नर्सरी सुरू करण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी आवश्यक माहिती, बी-बियाणे व लागवडीचे साहित्य गोळा करत व्यवसायास प्रारंभ केला.

advertisement

Farmer Success Story: तरुण शेतकऱ्याची शेतीच भारी, फळबाग शेतीतून साधली प्रगती, वर्षाला 27 लाख कमाई

नर्सरी व्यवसायाच्या सुरुवातीस काही अडचणी आल्या, मात्र तुषार यांनी हार न मानता सातत्याने मेहनत केली. दर्जेदार रोपे आणि वेळोवेळी खत आणि पाण्याची योग्य व्यवस्था केल्यामुळे त्यांची नर्सरी भरभराटीस आली. सध्या त्यांच्याकडे विविध प्रकारच्या झाडांची विक्री होते. विशेष म्हणजे, ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विक्री सुरू केली आहे.

advertisement

तुषार पवार यांना नर्सरी व्यवसायातून प्रतिवर्षी सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. ही रक्कम त्यांच्या नोकरीच्या पगाराच्या अनेकपटीने जास्त आहे. त्यामुळे त्यांनी नोकरीपेक्षा व्यवसाय फायदेशीर असल्याचे सिद्ध केले आहे. सध्या ते या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहेत आणि नव्या तरुणांना मार्गदर्शनही करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

तुषार पवार यांची ही यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कमी भांडवलातून सुरू होणाऱ्या व्यवसायातूनही मोठे उत्पन्न मिळवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. तुषार यांचे धाडस, दूरदृष्टी आणि कष्ट यामुळेच त्यांना हे यश मिळाल्याचे स्पष्ट दिसते. शेवटी आपल्या आवडीनुसार आणि योग्य मार्गदर्शनाने काम केल्यास कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: नोकरी सोडली, फक्त 20 गुंठ्यांमध्ये सुरू केला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल