शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय?
1 - हमीभाव आणि अनुदानात वाढ करावी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य किंमत म्हणजेच हमीभाव मिळावा (MSP) यासाठी केंद्र सरकारने योग्य निर्णय घ्यावा. यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, कापूस, कांदा यांसारख्या पिकांसाठी MSP मध्ये वाढ अपेक्षित आहे.
2 - बियाणे खते तसेच कीटकनाशकांवर मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात लागणारा खर्च कमी होईल.
advertisement
3 - कृषी व्यवसायात उत्पादन खर्च मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. अशातच आता शेतकऱ्यांना बँकांकडून शून्य टक्के व्याज दरात कर्ज मिळावे. तसेच कर्जमाफीसाठी ठोस योजना अंमलात आणावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.
4 - महाराष्ट्रात सह देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. त्यावर त्यावर उपाययोजना कराव्यात. तसेच नवीन सिंचन योजना आणि नदीजोड प्रकल्प राबण्यात यावेत.
5 - बदलत्या वतावरणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे आणि त्यावर उपाय योजना कराव्यात.
6 - शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. तसेच ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन आणि हवामान अंदाज यंत्रणा पुरवण्यासाठी आवश्यक असा निधी देण्यात यावा.