TRENDING:

तुम्हालाही कधी प्रश्न पडलाय का? हिवाळ्यातच लसूण महाग का होतो? त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे काय?

Last Updated:

Agriculture News : हिवाळा सुरू होताच बाजारात काही भाज्या आणि मसाल्यांच्या किमती वाढताना दिसतात. त्यात सर्वाधिक चर्चेत राहणारे उत्पादन म्हणजे लसूण.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
agriculture news
agriculture news
advertisement

मुंबई : हिवाळा सुरू होताच बाजारात काही भाज्या आणि मसाल्यांच्या किमती वाढताना दिसतात. त्यात सर्वाधिक चर्चेत राहणारे उत्पादन म्हणजे लसूण. सध्या वाशी येथील नवी मुंबई एपीएमसी बाजारात लसणाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी नोंदवलेली 3,819 गोण्यांची आवक असूनही बाजारातील तुटवडा कमी झालेला नाही. व्यापाऱ्यांच्या मते, नवीन हंगाम येण्यापूर्वी चांगल्या दर्जाच्या लसणाची उपलब्धता कमी असते आणि याच कारणामुळे दरात वाढ दिसून येते.

advertisement

हिवाळ्यात लसूण महाग होण्याची मुख्य कारणे

सध्या लसणाचा जुना साठा जवळपास संपत आला आहे. नवीन माल बाजारात यायला अजून 1-2 महिने लागणार असल्याने चांगल्या प्रतीचा लसूण मिळणे कठीण झाले आहे. परिणामी मागणी वाढत असून, उपलब्धता कमी झाल्याने दर वाढणे नैसर्गिक आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की मध्यप्रदेशातून येणाऱ्या 50% लसणाच्या मालात आतून फुसकळपणा वाढला आहे. अशा दर्जा घसरलेल्या मालाला बाजारात मागणी नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होते आणि चांगल्या दर्जाच्या मालाची टंचाई अधिक जाणवते. यामुळे उच्च प्रतीचा लसूण आणखी महाग होतो.

advertisement

मर्यादित आवक आणि वाढती मागणी

हिवाळ्यात लसणाची मागणी प्रचंड वाढते. स्वयंपाकात तसेच औषधी उपयोगात त्याचा अधिक वापर केला जातो. त्याचवेळी उपलब्धता कमी असल्याने दर झपाट्याने वाढतात. मध्यप्रदेशाहून येणारा माल दर्जाहीन ठरत आहे, तर गुजरातहून माल येऊ लागला असला तरी बाजारातील एकूण मागणी भागवण्यासाठी तो पुरेसा नाही. एकंदरीत चित्र सुधारण्यासाठी आणखी 1-2 महिने लागू शकतात, असे व्यापाऱ्यांचे अंदाज आहेत.

advertisement

हिवाळ्यात लसूण खाण्याचे फायदे

लसूण हा फक्त स्वयंपाकातील चव वाढवणारा घटक नसून आयुर्वेदात त्याला “नैसर्गिक प्रतिजैविक” मानले जाते. हिवाळ्यात त्याचे सेवन शरीराला अनेक प्रकारे लाभदायी ठरते. हिवाळ्यात सर्दी-खोकला, व्हायरल संसर्ग वाढतात. लसणातील अ‍ॅलिसिन हे घटक जंतुनाशक आणि व्हायरसविरोधी गुणधर्म वाढवतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. तसेच लसूण शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो आणि नैसर्गिकरित्या उब प्रदान करतो. त्यामुळे थंड हवेत शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

advertisement

हृदयाचे आरोग्य सुधारते

लसूण रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही तो उपयुक्त आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हिवाळ्यात जड आहार घेतला जातो. लसूण पोटातील सूज कमी करतो आणि पचनक्रिया सुधारतो. त्यामुळे अॅसिडिटी, गॅसेस आणि अपचन दूर होण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी उपाय कारक

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. लसूणातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेची आर्द्रता वाढवतात. त्याचबरोबर केसगळती कमी करण्यासाठी तो फायदेशीर ठरतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दर घसरलेलेच, सोयाबीन आणि कांद्याची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
तुम्हालाही कधी प्रश्न पडलाय का? हिवाळ्यातच लसूण महाग का होतो? त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल