TRENDING:

Today Horoscope : 21 मार्चला शनि चाल बदलणार! ३ राशींची चिंता मिटणार, राजासारखं आयुष्य जगणार

Last Updated:

Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव यांना कर्मफळ देणारा, न्यायप्रिय आणि शिस्तीचा ग्रह मानले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव यांना कर्मफळ देणारा, न्यायप्रिय आणि शिस्तीचा ग्रह मानले जाते. शनि हा अत्यंत मंद गतीने भ्रमण करणारा ग्रह असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास त्याला साधारण अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळ जाणवतो. सध्या शनि गुरुच्या मीन राशीत असून उत्तराभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. 21 मार्च 2026 रोजी शनिवारी सायंकाळी शनि या नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे.
Today Horoscope
Today Horoscope
advertisement

या काळात शनि अस्त अवस्थेत असणार असल्याने काही राशींवर याचा विशेष प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचे नक्षत्र परिवर्तन जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणते. या बदलामुळे काही राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

मेष रास

मेष राशीत शनि बाराव्या भावात असून साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनीच्या नक्षत्र बदलामुळे आणि अस्त अवस्थेमुळे आरोग्याशी संबंधित त्रास कमी होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या अडचणी हळूहळू संपतील. नशिबाची साथ मिळेल आणि काहींना कर्जातून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल.

advertisement

सिंह रास

सिंह राशीसाठी शनि अष्टम भावात आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी दिसतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या संधी मिळू शकतात. मानसिक तणाव कमी होईल आणि आरोग्यात सुधारणा जाणवेल. कामात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढेल.

धनु रास

धनु राशीत शनि चौथ्या भावात अस्त होत आहे. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायात वाढ आणि विस्तार होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन कौशल्ये शिकण्याची प्रेरणा मिळेल आणि प्रगतीच्या संधी वाढतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Today Horoscope : 21 मार्चला शनि चाल बदलणार! ३ राशींची चिंता मिटणार, राजासारखं आयुष्य जगणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल