मुंबई : नोव्हेंबर महिना आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा महिना काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे या काळात अनेकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. पंचांगानुसार, या महिन्यात शुक्र, सूर्य आणि बुध हे तीन महत्त्वाचे ग्रह आपापली राशी बदलणार आहेत. या संक्रमणाचा परिणाम काही राशींवर विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहेत, पाहूया सविस्तर.
advertisement
मेष
या महिन्यात मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात नवी उंची गाठण्याची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवीन करार किंवा भागीदारीमुळे चांगला नफा मिळू शकतो. घरात शुभ प्रसंग घडेल आणि वैयक्तिक जीवनात स्थैर्य येईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक राहील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्यात जुनी कामं पूर्ण होण्याची आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. या काळात नवीन योजना आखण्यासाठी आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रवासाचे योग निर्माण होतील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात व्यावसायिक आयुष्यात नवे वळण येईल. नवीन जबाबदाऱ्या आणि आव्हाने येतील, परंतु त्यातून भविष्यात मोठे यश मिळू शकते. घरगुती जीवनात थोडासा ताण जाणवेल, परंतु संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान लाभेल. भगवान हनुमानाची पूजा केल्यास विशेष लाभ मिळेल.
कन्या
या महिन्यात कन्या राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या फायदा होईल. शुक्राच्या भ्रमणामुळे नवे उत्पन्नाचे मार्ग खुलतील. महिन्याच्या मध्यावर खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यातून मान-सन्मान वाढेल. बुध ग्रहाच्या कृपेने निर्णयक्षमता वाढेल आणि अडकलेली कामं पूर्ण होतील.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर महिना विशेष लाभदायक ठरेल. नोकरी बदलण्याचा किंवा नवीन संधी स्वीकारण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. व्यवसायात भागीदारीतून किंवा नव्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
